Goa Murder Case: ‘मी दुसऱ्या रुममध्ये झोपायचो म्हणून…’, सूचना सेठच्या पतीने अखेर केला खुलासा

गोव्यातील हत्या प्रकरणाने सध्या देश हादरला आहे. पोलिसांनी आरोपी सूचना सेठ आणि तिचा पती वेंकट यांना आमने-सामने आणलं असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पती वेंकटने पोलिसांना सांगितलं की, मुलगा झाल्यानंतर मी दुसऱ्या रुममध्ये झोपत होतो. यावरुन सूचना माझ्याशी भांडायची. सूचना सेठवर आपल्या 4 वर्षाच्या मुलाच्या हत्येचा आरोप आहे. 15 मिनिटं सूचना सेठ आणि वेंकट यांच्यात जोरदार वाद सुरु होता. सूचना नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या दोषी ठरवते, ही तिची सवय आहे असंही त्याने सांगितलं, 2019 मध्ये मुलाच्या जन्मानंतर आपल्यात भांडणं सुरु झाल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. 

वेंकटने पोलिसांना सांगितलं की, 9 वर्षं आमच्यात सर्व काही आलबेल होतं. पण 2019 मध्ये मुलाच्या जन्मानंतर वेंकटच्या वागण्यात बदल झाले. मुलगा लहान असल्याने मी दुसऱ्या खोलीत जाऊन झोपू लागलो होतो. पण यावरुनच सूचनाने माझ्याशी भांडायला सुरुवात केली होती. मी मुलाची जबाबदारी घेत नाही असं सचूनाचं म्हणणं होतं. यावरुनच आग पेटली जी थेट घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचली. 

वेंकटने सांगितलं की, मी नव्हे तर सूचनाने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. दुसरीकडे सूचनाने पोलिसांना मुलाचा मृत्यू कसा झाला हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा केला आहे. 7 जानेवारीला मी झोपायला गेली तेव्हा मुलगा जिवंत होता, पण सकाळी पाहिलं तर मृत्यू झाला होता असा तिचा दावा आहे. 

हेही वाचा :  आरोपांची धुळवड : ‘भाजप नेत्यांविरोधात सरकारचे कारस्थान’

‘मी वाट पाहिली, पण ती आली नाही’

वेंकटने सांगितलं की, मुलाला मला भेटायचं होतं. पण ही गोष्ट सूचनाला आवडत नव्हती. आधी ती मला मुलाला भेटू देत नसे. पण प्रकरण कोर्टात पोहोचलं तेव्हा मला माझ्या मुलाला भेटण्याची परवानगी मिळाली. डिसेंबर 2022 पर्यंत मी आपल्या मुलाला भेटू शकलो नव्हतो. पण कोर्टाच्या आदेशानुसार जानेवारी 2024 पर्यंत मी मुलाला भेटू शकत होतो. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला मुलाला भेटायचं होतं. पण सूचना त्याला घेऊन गोव्याला गेली. तिने याबद्दल कोणालाच सांगितलं नाही. मी मुलाला भेटण्याची वाट पाहत होतो. मी ठरलेल्या दिवशी (7 जानेवारी) मुलाची वाट पाहत होतो, पण सूचना आली नाही. मी सूचनाला अनेकदा फोनही केला, पण तिने तो उचलला नाही. 

वेंकटने सूचनाला ई-मेल आणि मेसेज पाठवले

वेंकटचे वकील अजहर मीर यांनी सांगितलं की, आम्ही पोलिसांकडे सूचना आणि वेंकटच्या घटस्फोटाशी संबंधित कागदपत्रं दिली आहेत. 7 जानेवारीला वेंकट मुलाला भेटण्यासाठी गेले होते, पण सूचना आली नाही. त्यांनी मला सांगितलं असता मी ई-मेल आणि मेसेज करण्यास सांगितलं. जेणेकरुन आम्हाला कोर्टात सूचना मुलाला भेटू देत नसल्याचं सिद्ध करता येईल. वेंकटने तसंच केलं. वेंकटने ‘तुम्ही सर्व ठीक आहात का?’ असा मेसेज पाठवला, पण उत्तर आलं नाही 

हेही वाचा :  मी माझ्या मुलाची हत्या केली नाही, मी झोपेतून उठली तेव्हा...; सूचना सेठचा नवा दावा

सूचना सेठला 5 दिवसांची पोलीस रिमांड

सूचना सेठची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर सोमवारी पणजी कोर्टात हजर करण्यात आलं. तिची 6 दिवसांची पोलीस कोठडी संपत होती. पोलिसांनी रिमांड वाढवून मागितली असता कोर्टाने आणखी 5 दिवसांची वाढ केली आहे. सूचना सेठने अद्याप हत्येमागील नेमका हेतू सांगितलेला नाही. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …

‘मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. …