Eknath Shinde: “हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, अजितदादा तुमचं पाप आमच्या माथ्यावर मारू नका”

G-20 Summit,Eknath Shinde: जी 20 परिषदेच्या तयारीसंदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. राष्ट्रपती भवनाच्या (Rashtrapati Bhavan) सांस्कृतिक केंद्रात ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केजरीवाल, स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी सहभागी झाले होते. त्यावर, G-20 आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या देशासाठी यजमानपद मिळालंय. यात देशांतील अनेक मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रात 4 समिट बैठका होता आहेत. या बैठकीत सादरीकरण झालंय. त्यांचा पाहुणचार झाला, अशी माहिती एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. (G20 summit chief minister eknath shinde Criticized ajit pawar and uddhav thackeray after all party meeting marathi news)

जी 20 परिषद (G-20 Summit) हा फक्त केंद्राचा कार्यक्रम नव्हता. निमंत्रण सर्व पक्षाला गेलं होतं. राज्याचं देशाचं देशप्रेम यातून दिसलंय, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. या बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचंय?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. हे बेगडी प्रेम आहे, असंही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत.

हेही वाचा :  शेवटची संधी, नाही तर आम्ही थेट कर्नाटकात जाऊ... जतमधील कृती समितीचा महाराष्ट्र सरकारला इशारा

विरोधकांवर टीका करताना, आता आम्ही समृद्धी मार्गावर गेलो तर काही लोक रस्त्यावर आले. मी मुख्यमंत्री झालो तर काही लोक घराबाहेर आले, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. बेळगाव सीमा बांधवांबद्दल बोलताहेत त्यांनी धाडसीपणा आम्हाला सांगू नका. हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

आणखी वाचा – पक्षबांधणी सुरु असतानाच राज ठाकरेंना मोठा धक्का; तब्बल 400 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

दरम्यान, सीमेवरील गावात विस्तारीकरण चाललंय. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचे बेगडी प्रेम दिसतंय. ते (Mahavikas Aghadi) आज कार्यक्रमाला आले नाही. अजितदादा (Ajit Pawar) तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका. अजितदादांनी काय केलं? आरोपाला उत्तर देण्यासाठी आम्ही रिकामे नाही, आम्ही कामानं उत्तर देऊ, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde On Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …