भयंकर, या कारणासाठी नवरीने तोडलं जुळून आलेलं लग्न, कारण ऐकलं तर चक्कर येऊन पडाल

लग्न म्हणजे आयुष्यातला एक अविस्मरणीय सोहळा, हा सोहळा नीट पार पडावा म्हणून आपण खूप प्रयत्न करतो. वेळ देतो. त्यासाठी पैसे खर्च करतो. पण अनेकदा असे होते की लग्नात काही गोष्टी या मनाविरुद्ध घडतात. अशाने खूप वाईट वाटतं. मन दुखावलं जातं. समजा तुमच्या सोबत असे झाले तर? एखादी गोष्ट तुमच्याच लग्नात तुमच्या मनाविरुद्ध घडली तर? मग तुम्ही काय कराल?

समजून घ्याल की लग्न मोडाल? समजून घ्याल ना? कारण एवढा खर्च झाला आहे. घरची इभ्रत वेशीला टांगली आहे. पण मंडळी काही जण असेही असतात जे अशा वेळी सुद्धा स्वत:चा विचार करून लग्न मोडतात. हो मंडळी आणि उत्तराखंडमध्ये अशीच एक घटना खरंच घडली आहे. ही घटना ऐकून तुमचेही डोके चक्रावून जाईल.

नक्की घडले काय?

तर ही घटना घडली उत्तराखंड राज्यामध्ये, इथे एका तरुणीचे एका तरुणाशी लग्न ठरले. लग्नाची तयारी मोठ्या उत्साहात सुरु होती. दोन्ही घरात लगबग सुरु होती. लोकांच्या म्हणण्यानुसार नवरा नवरी देखील खूप खुश होते. आता लग्न म्हटले की प्रथा आल्याच तर मुलाकडच्यांनी मुलीला लेहंगा देण्याची इथे प्रथा आहे. प्रथे प्रमाणे वर पक्षाने त्या मुलीला लेहंगा दिला. तो लेहंगा पहिल्या बरोबर मुलींचा राग एवढा अनावर झाला कि तिने थेट लग्नच मोडले. हो मंडळी विश्वास बसत नाही ना? पण खरंच हे असंच घडलं आहे.

हेही वाचा :  चक्क ओव्हरसाईज स्वेटशर्टमध्ये मलायकाचा ग्लॅमरस लुक, विंटरलुक पाहून चाहत्यांना भरली हुडहुडी

(वाचा :- माझी कहाणी : वयाच्या 36 शी मध्येही मी सिंगलच आहे, याचे कारण खूपच लाजिरवाणे व विचित्र आहे..!)

पण राग का आला?

आता तुमच्या मनात आले असेल की मुलीला नेमका राग कशाचा आला? म्हणजे लेहंगा आवडला नाही काअ? त्याचा कलर खराब होता का? तर मंडळी असे काहीच नव्हते. फक्त 10 हजार रुपयांचा लेहंगा दिला म्हणून या मुलीचे डोके सटकले. तिच्या मते तिला महागतला भरजरी लेहंगा हवा होता. पण एवढा स्वत लेहंगा मिळेल याची अजिबात अपेक्षा तिने जेली नव्हती. तो लेहंगा पाहताच तिने रागाने हा लेहंगा फेकून दिला आणि एवढेच नाही तर अशा घरात आपल्याला जायचे नाही असे म्हणून चक्क लग्न मोडले.

(वाचा :- श्रद्धासारखंच 12 वर्षापूर्वी राजेशने केले अनुपमाचे 70 तुकडे, एक्सपर्टने उलगडलेले भयंकर सत्य प्रत्येकास माहित हवे)

पोलिसांनी केली मध्यस्थी

लेहंगा पाहून मुलगी रागावली आणि तिने लग्न मोडले. तिने लग्न मोडले हे पाहताच मुलाकडचे पण चिडले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण एवढा खर्च केला तो वाया गेला. शिवाय इभ्रत तर गेलीच. काय करावे काही सुचेना. वर पक्षाने मुलीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. प्रलोभने दिली. पण काहीच फरक पडला नाही. शेवटी फसवणूक झाली असे म्हणून मुलाकडच्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. पोलिसांनी यात मध्यस्थी करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

हेही वाचा :  कारचा भीषण अपघात, पोलिसासह तिघेजण गाडीबाहेर फेकले गेले, PSIचा दुर्दैवी मृत्यू

(वाचा :- माझी कहाणी : माझा बॉयफ्रेंड दुस-या मुलीसोबत अफेअर करत राहिला आणि जेव्हा मला कळलं तेव्हा त्याने जे केलं ते भयंकर)

सासऱ्यांनी एटीएम देखील दिले

दोघांचा साखरपुडा जून मध्ये झाला होता आणि लग्न नोव्हेंबर मध्ये होते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लाग्न्च्या पत्रिका देखील वाटल्या गेल्या होत्या. पण त्यानंतर लेहंगा प्रकरण झालं आणि सगळं काही बिघडून गेलं, काही लोकांच्या माहितीनुसा स्वत: सासऱ्यांनी तिला खूप समजावलं. त्यांना आपली चूक कळली आणि त्यांनी हवा त्या किंमतीचा लेहंगा खरेदी करण्यासाठी आपले एटीएम कार्ड सुद्धा देऊ केले. पण पोरगी एवढी हट्टी की कशालाच भुलली नाही आणि तिने सरळ लग्न करायचेच नाही हे सांगून टाकले. पोलिसांनी सुद्धा यावर काही उपाय निघत नाही हे पाहून लग्न तोडा असाच सल्ला दिला. दोन्ही पक्षाने हाच निर्णय मानून लग्न मोडले.

(वाचा :- माझी कहाणी : बायकोच्या या गोष्टीमुळे मी कर्जबाजारी झालोय, असंच चालत राहिलं तर मी लवकरच रस्त्यावर येईन, काय करू?)

घरच्यांचा विचार केला नाही

इथे सगळ्यात जास्त वाईट वाटतंय ते दोन्ही कुटुंबाचं! त्यांची काही चूक नसताना त्यांना यात खूप काही भोगावं लागलं. त्या मुलीने थोडा जरी विचार केला असता तर आता गोष्टी वेगळ्या असत्या आणि लग्न नीट झाले असते. पण आता दोन्ही घरांसाठी हा काळ आणि ही घटना क्लेशदायक ठरली. केवळ एवध्यशुअ शुल्लक कारणांसाठी लग्न मोडणे यापेक्षा दुर्दैववी गोष्ट काही नाही.

हेही वाचा :  शरीरातील ५ आजार दूर करते हे पाणी असणारे फळ, उन्हाळा सुरू होताच घ्या डाएटमध्ये सामावून

(वाचा :- माझी कहाणी : ऑर्कुटवर ओळख झाली, आकंठ प्रेम झालं, सारं जग सोडण्यासाठी मी तयार होती, पण त्याचा हेतू वेगळाच निघाला)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …