या कारणामुळे तुटली अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची एंगेजमेंट?

आज अभिषेक बच्चन आज ऐश्वर्या रायसोबत आनंदी जीवन जगत आहे. तर दुसरीकडे करिश्मा कपूरही तिच्या आयुष्यात व्यस्त आहे. पण एक वेळ असा होता जेव्हा अभिषेक आणि करिश्मा एकमेकांवर खूप प्रेम करत होते. पण त्यांचे ब्रेकअप झाले होते. अभिषेक आणि करिश्माचे ब्रेकअप झाल्यावर त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. करिश्मा आणि अभिषेकची एंगेजमेंट का तुटली हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यांनी लग्न का केले नाही? आता या प्रश्नाचे उत्तर चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी दिले आहे. सुनील दर्शनने यांनी 2002 मध्ये हा मैं भी प्यार किया हा चित्रपट तयार केला होता, तर धर्मेश दर्शन त्याचे दिग्दर्शक होते. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची जोडी होती. या चित्रपटातील अभिषेक आणि करिश्माची केमिस्ट्री अप्रतिम होती. त्यावेळी दोघेही एकमेकांना डेट करत होते, पण खऱ्या आयुष्यात त्यांच्यात काहीच साम्य नव्हते.सुनील दर्शन यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत करिश्मा आणि अभिषेकच्या नात्याबद्दल आणि सेटवर ते किती भांडायचे याबद्दल सांगितले आहे.

हेही वाचा :  युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थी अडकलेत, यावरुन मोठा पेच

​त्या दिवशी असे झाले

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शनला करिश्मा आणि अभिषेकच्या नात्याबद्दलच्या अफवांवर विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘त्या अफवा नाहीत. त्यांचे नाते पक्के झाले. ते जोडपे होते आणि लवकरच लग्न करणार होते. दोन्ही कपूर बहिणी माझ्या जवळ होत्या. जोपर्यंत अभिषेकचा संबंध आहे, हान मैने भी प्यार किया है हा एक खास चित्रपट होता आणि तो खास असायला हवा होता. हा एकमेव चित्रपट होता ज्यात अभिषेक आणि करिश्माने एकत्र काम केले होते. करिश्मा आणि अभिषेकने या चित्रपटापूर्वी किंवा नंतर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केले नव्हते.

करिश्मा आणि अभिषेक एकमेकांसाठी बनले नव्हते

सुनील दर्शन पुढे म्हणाले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करिश्मा आणि अभिषेक एकमेकांसाठी बनले आहेत असे त्यांना कधीच वाटले नव्हते. सुनील दर्शन म्हणाले, ‘ते एकमेकांशी सतत भांडायचे. त्यांना पाहून मला नेहमी असाच प्रश्न पडायचा की हे खरंच एकमेकांसाठी बनलेले आहेत का? अभिषेक आणि करिश्मा दोघंही खूपच चांगले आहेत पण काही गोष्टी एकत्र येण्यासाठी नसतात. (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

हेही वाचा :  ​घरबसल्या आधार कार्ड 'फ्री' मध्ये करा अपडेट, १४ जून २०२३ पर्यंत संधी, त्यानंतर मोजावे लागणार पैसे

​अभिषेकचे ऐश्वर्या आणि करिश्माचे लग्न संजय कपूरसोबत

अभिषेक बच्चनने 2007 मध्ये ऐश्वर्या रायशी लग्न केले, तर करिश्माने 2003 मध्ये दिल्ली स्थित उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. लग्नानंतर करिश्माने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. पण करिश्माचे संजयसोबतचे लग्न टिकले नाही आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तर दुसरीकडे अभिषेक बच्चन ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​ब्रेकअपमधून असे बाहेर पडा

जेव्हा तुम्ही ब्रेकअप या परिस्थितीमधून जात असता तेव्हा या काळाला कठीण काळ न समजून या काळात स्वत:ला महत्त्व द्या. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. प्रत्येक गोष्टीमागे कारण असते ते समजण्याचा प्रयत्न करा. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​स्वत:कडे जास्त लक्ष द्या

याकाळात तुम्ही स्वत:कडे जास्त लक्ष द्या कोण काय म्हणत आहे लक्षात न घेता. स्वत:च्या आवडीकडे लक्ष द्या. याकाळात तुम्हाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी करा. (वाचा :- कियारा आडवाणीला डेनिम फिव्हर, बारीक नॉट्सचा डीपनेक टॉप आणि स्किन फिट पॅन्ट घालून चुकवला चाहत्यांचा हृदयाचा ठोका)

हेही वाचा :  मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लग्न करणार? मलायकाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …