शरीरातील ५ आजार दूर करते हे पाणी असणारे फळ, उन्हाळा सुरू होताच घ्या डाएटमध्ये सामावून

अनेक फळं आहेत जी उन्हाळ्यात तुमच्या प्रतिकारशक्तीला चालना देण्यास मदत करतात. पण त्यापैकी उत्तम फळ ठरते ते म्हणजे ताडगोळा. Ice Apple Fruit नावाने ओळखले जाणारे हे फळ उन्हाळ्यात खूपच जास्त प्रमाणात बाजारात दिसून येते. गोड शहाळ्यासारखं पाणी आणि बाहेरून जेलीप्रमाणे लिबलिबित असणारे पण चवीला उत्तम असा हा ताडगोळा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. याची चव ही शहाळ्यातील पाण्यासारखीच असते पण दिसायला हे फळ लिचीसारखे दिसते. त्वचेवरील रॅश, खाज, घामुळं यावर उत्तम उपाय म्हणजे ताडगोळ्याचे सेवन. काय आहेत ताडगोळ्याचे फायदे जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)

​ताडगोळ्यातील पोषक तत्वे​

​ताडगोळ्यातील पोषक तत्वे​

ताडगोळ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. कॅल्शियम, जिंक, पाणी, लोह, फॉस्फोरस, एनर्जी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि याशिवाय अनेक पद्धतीचे फायटोन्यूट्रिएंट्स असतात, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटिबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी इत्यादी गोष्टींचा समावेश असून आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यामध्ये कॅलरीदेखील अत्यंत कमी असून विटामिन बी, सी, ई, के जास्त प्रमाणात आढळते.

हेही वाचा :  महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

​शरीर ठेवते हायड्रेटेड​

​शरीर ठेवते हायड्रेटेड​

शरीर हायड्रेट न राहिल्यास, त्वचा कोरडी पडून त्रास होतो. उन्हाळ्याच्या दिवसात शरीर अधिक हायड्रेट राहण्याची गरज असते. ताडगोळ्यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असल्याने आणि यातून अधिक एनर्जी मिळत असल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ताडगोळ्याचा उपयोग होतो.

(वाचा – जमिनीवर बसून जेवण्याचे आहेत Weight loss सह जबरदस्त फायदे, डायनिंग टेबलजवळ बसणं ठरतंय घातक)

​पोटातील जळजळ होते कमी​

​पोटातील जळजळ होते कमी​

पोटामध्ये जळजळ होण्याचा त्रास असेल तर तुम्ही नक्की ताडगोळा खावा. यामध्ये असणारे पोषक तत्व आणि मिनरल्स पोटातील जळजळ कमी करून पोटाला अधिक शांतता मिळवून देतात. तसंच तुम्हाला थकवा जाणवत नाही आणि ताडगोळ्याच्या थंडाव्यामुळेही पोटातील जळजळ कमी होते.

(वाचा – दुधात भिजवा काजू आणि मिळवा अफलातून फायदे, ऐकाल तर व्हाल हैराण)

​डायबिटीससाठी गुणकारी​

​डायबिटीससाठी गुणकारी​

ताडगोळा हे अत्यंत कमी कॅलरी असणारे फळ आहे. यामध्ये विटामिन ए आणि विटामिन सी सह लोह, जिंक, कॅल्शियम, फॉस्फोरस, थियामाईन आणि रिबोफ्लेविनसारखे विटामिन्स असतात. हे सर्व मिनरल्स प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. या कारणामुळे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी गुणकारी ठरते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.

हेही वाचा :  Maharastra Politics: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का? सुप्रिया सुळे म्हणतात...

(वाचा – रोज सकाळी भिजवलेले खजूर आरोग्यासाठी ठरतात वरदान, हृदयरोग ते बद्धकोष्ठता आजारांवर गुणकारी)

​वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ​

​वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ​

१०० ग्रॅम ताडगोळ्यात केवळ ४० ग्रॅम कॅलरी असते. तसंच ताडगोळा खाल्ल्याने पोट पटकन भरते. यामध्ये पाण्याचे प्रमाण असल्याने जास्त भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास फायदा मिळतो. तसंच वजन कमी करण्यासह पाणी पोटात गेल्याने त्वचाही चांगली राहाते.

​उलटीसाठी उत्तम उपाय​

​उलटीसाठी उत्तम उपाय​

उलटी होत असल्यास, तुम्ही घरगुती उपाय शोधत असलात ताडगोळा हा उत्तम पर्याय आहे. तसंच पोटात जंत झाले असतील तर त्यावरही तुम्ही ताडगोळा खाऊ शकता. यामध्ये पोटॅशियम अधिक प्रमाणात असल्यामुळे लिव्हर टॉनिकप्रमाणे याचा उपयोग होतो.

टीप – ही माहिती आम्ही आरोग्यासाठी दिली असली तरीही तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास, डॉक्टरांशी सल्लामसलत करा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …