Maharastra Politics: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का? सुप्रिया सुळे म्हणतात…

Supriya Sule Interview: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात मोठे बदल होताना दिसत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिल्यानंतर अनेक घडामोडी घडत असल्याचं दिसतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी झी 24 तासच्या (Supriya Sule Interview On Zee 24 Taas)  ब्लॉक अँड व्हाईट मुलाखतीत अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिली आहेत. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदावर प्रश्न विचारण्यात आले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

तुम्ही कार्याध्यक्ष झाल्या पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान जर तुमच्या वाटेला आला तर तुम्ही त्याला पसंती द्याल का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारला गेला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर देणं टाळलं. मुख्यमंत्रीपदाला एकतर जेंडर (लिंग) नसतं. ना पुरूष ना महिला… दुसरं म्हणजे मुख्यंत्र्यांचंपद हे अशाच व्यक्तीकडं जायला हवं, जो यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. ते नुसतं पद नाही, ती खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्या पदाला जेंडरमध्ये बांधून ठेवणं चुकीचं आहे. मुख्यमंत्री कर्तुत्वान असायला हवा. प्रत्येकाला इच्छा असते.

हेही वाचा :  लग्नानंतर 20 तासात सासर सोडून गेली नववधू, सत्य समोर येताच कुटुंब हादरलं; थेट गाठलं पोलीस स्टेशन

पक्षाला वाटलं जर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळावं, जर तुम्ही इच्छुक असाल का? या प्रश्नावर सुळे यांनी बगल देण्याचा प्रयत्न केला. मी कशाचीच इच्छा नाही. जे आपल्या हातात नसतं, त्याची इच्छा काय ठेवायची. मी राजकारणात कशासाठी आले, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. मी पॉलिसी लेवलला काम करून, लोकांच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी आले आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

मी भाऊ म्हणून नेता म्हणून अजितदादाच्या संपर्कात होते. मात्र,पहाटेच्या शपतविधीची मला माहिती नव्हती. मला सदानंद सुळे यांनी शपथविधीची माहिती दिली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत स्पष्ट मत मांडलंय. दादाच्या मनात काय घालमेल झाला मला माहिती नाही. तुम्ही किती दिवस तोच विषय मांडणार?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.

आणखी वाचा – यंत्रणा वेळेत पोहोचली पण… मुख्यमंत्र्यांनी सांगितलं घटनास्थळी नेमकं काय घडलं

दरम्यान, अजितदादा आणि माझ्यात स्पर्धा नाही. मी आणि अजितदादा म्हणजे काही राष्ट्रवादी नाही. लाखो कार्यकर्त्यांमुळे हा राष्ट्रवादी पक्ष आहे. आमची त्याच्यावर मत्तेदारी नाही. मी संसदेत समाधानी आहे. झपाटून काम करणं ही अजितदादाची सवय आहे. त्यामुळे छोट्या खिडकीतून पाहणं चुकीचं आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हेही वाचा :  Maharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …