मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त

Subi Suresh : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. आता मल्याळम अभिनेत्री (Malayalam actress) सुबी सुरेश (Subi Suresh) यांचे निधन झाले आहे. सुबी यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 

सुबी सुरेश (Subi Suresh Passes Away) यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवासांपासून यकृतासंबंधित (Liver Disease) आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर कोची येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांच्या निधनाने चाहत्यांकडून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे. सुबी यांना नृत्याची आवड असल्याने त्यांनी नृत्यांगणा म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर अनेक विनोदी कार्यक्रमात त्यांनी काम केलं. 


सुबी सुरेश यांच्याबद्दल जाणून घ्या…

सुबी सुरेश या मल्याळम मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांची विनोदी शैली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. कॉमेडी शो आणि मालिकांमध्ये त्यांनी जास्त काम केलं आहे. ‘कुट्टी पट्टलम’ (Kutty Pattalam) हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम. नाटकांसह त्या ‘गृहनाथन’, ‘Thaksara Lahala’, ‘एलसम्मा एन्ना आंकू’ या लोकप्रिय सिनेमांतदेखील झळकल्या आहेत. 

हेही वाचा :  श्रेयसला मागावी लागली माफी; शेअर केली पोस्ट, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

सुबी सुरेश यांनी ‘सिनेमाला’ (Cinemala) या मल्याळम कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे. 2006 साली ‘कनस सिम्हासनम’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण ‘कुट्टीपट्टलम’ (Kutty Pattalam) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या घराघरांत पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी हस्बैंड, ‘एल्सम्मा एना अंकुट्टी’ (Elsamma Enna Aankutty) अशा सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

सुबी (Subi Suresh Passes Away) यांच्या निधनानंतर त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीनने पोस्ट केली आहे की,”एका गोष्टीचा शेवट झाल्यानंतर नवीन गोष्टीची सुरुवात होत असते. पुन्हा भेटू…धन्यवाद”. या पोस्टवर मल्याळम सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसह चाहतेदेखील शोक व्यक्त करत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bela Bose Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगणा बेला बोस काळाच्या पडद्याआड; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …