काय आहे ABCG ज्यूस? Madhuri Dixitचे पती डॉ.श्रीराम नेने म्हणतात, व्हिटॅमिनने परिपूर्ण ज्यूस, जाणून घ्या फायदे

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चे पती डॉ. श्रीराम नेने (Dr Shriram Nene) लोकप्रिय कार्डियोवास्कुलर सर्जन (Cardiovascular Surgeon) आहेत. काही दिवसांपूर्वी डॉ. नेने यांनी इंस्टाग्रामवर एका ज्यूसचा फोटो शेअर केला आहे. यानंतर या ज्यूसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. या पोस्टला त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की, ABCG ज्यूससोबत रविवारची सुरूवात करण्यात एक वेगळीच मजा आहे. हा ज्यूस सफरचंद / चुकंदर / गाजर / अदरक यांनी मिळून तयार केलं आहे. यामध्ये सर्वाधिक व्हिटॅमिनचा समावेश करण्यात आला आहे.

बहुतेक लोकांना रसाच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल माहिती असते. योग्य पदार्थांचा ज्यूस पिणे अत्यंत गरजेचं आहे. अशावेळी ABCG हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तज्ज्ञांनी स्वतः याचे सेवन केल्यावर त्याबद्दल संभ्रम निर्माण होत नाही. परंतु जर तुम्हाला कोणताही आरोग्याचा त्रास झाला तर हा ज्यूस घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  माधुरी दीक्षितनं ‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावरील डान्सचा ट्रेंड फॉलो केल्यानं नेटकरी संतापले

ABCG चे फायदे

​काय आहे ABCG चा ज्यूस

-abcg-

ABCG रस भाज्या, फळे आणि मसाल्यापासून तयार केला जातो. ABCG म्हणजे सफरचंद, बीटरूट, गाजर, आले. हा रस जस्त, पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी इत्यादींसारख्या अनेक आवश्यक पोषक तत्वांनी भरलेला आहे. हा रस रिकाम्या पोटी सेवन करणे उत्तम मानले जाते.

ज्यूसचे साहित्य

300 ग्रॅम – बीटरूट

300 ग्रॅम – गाजर

100 ग्रॅम – सफरचंद

½ इंच – आले

चवीनुसार मीठ / पर्यायी

ज्यूस बनवण्याची कृती

सर्वप्रथम बीटरूट, गाजर, सफरचंद, आले कापून त्यांचा रस काढा. आता ते चांगले मिसळा आणि गाळून घ्या. आता चवीनुसार मीठ घालून सेवन करा.

(वाचा – शरीरातलं रक्त, पाणी सुकवून टाकतात हे १५ पदार्थ, यामुळेच कमी वयात होतात हार्ट अटॅक-कॅन्सरसारखे जीवघेणे आजार)

​सफरचंदाच्या ज्यूसचे फायदे

एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार सफरचंदात मधुमेह, हृदयविकार, दमा आणि कर्करोगापासून बचाव करणारे गुणधर्म आहेत. याशिवाय यामध्ये अँटी-ऑक्सिडंट इफेक्ट्स देखील आढळतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात.

(वाचा – थायरॉइड आणि डायबिटिजचं अस्तित्वच नष्ट करतील ‘ही’ हिरवी पानं, Deepika च्या न्यूट्रिशनिस्टने सांगितला रामबाण उपाय)

हेही वाचा :  90s Actress On OTT : 'या' 90 च्या दशकातील अभिनेत्रींचा ओटीटीवर जलवा

​बीटमुळे ज्यूस बनतो अधिक पावरफूल

बीटरूटमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात. जे जळजळ आणि कर्करोग आणि इतर रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. याशिवाय बीटरूट वर्कआउट दरम्यान हृदय आणि फुफ्फुसांना चांगले काम करण्यास मदत करते. त्यात असलेले नायट्रिक ऑक्साईड स्नायूंना रक्तपुरवठा वाढवते.

(वाचा – Weight Loss Story : शशांकने ७ महिन्यात ३२ किलो वजन केलं कमी, ५ गोष्टी कमी केल्या आणि फरक अनुभवला)

​गाजरामुळे पचनक्रिया सुधारते

NIH च्या अभ्यासानुसार गाजर मधुमेह, कर्करोग, हृदयविकारात फायदेशीर आहे. तसेच, त्याचा रस पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करतो. त्यात असलेले कॅरोटीनॉइड्स आणि आहारातील फायबरसारखे बायोएक्टिव्ह संयुगे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात.

(वाचा – Men’s Day : केस गळणं वंध्यत्वाचं मुख्य लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष ‘या’ पदार्थाला करा हद्दपार ))

​ज्यूसमध्ये आल्याचा टच

आले ही आयुर्वेदातील सर्वात प्राचीन औषधी वनस्पतींपैकी एक आहे. वर्षानुवर्षे ते अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जात आहे. प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळणारा हा पदार्थ आतडे आणि पचनसंस्थेसाठी औषधाप्रमाणे काम करतो. यासोबतच कॅन्सर, अल्झायमर, हृदयविकार, मासिक पाळीच्या दुखण्यावरही हे फायदेशीर आहे.

हेही वाचा :  40 वर्षांच्या संसारात शबाना आझमी व जावेद अख्तर कधीच नाही भांडले, या जादुई ट्रिकची सर्व कमाल

(वाचा – International Men’s Day: Sperm काऊंट कसा वाढवावा? ५ गोष्टी ठरतील जालीम उपाय, खाताच १०० स्पीडने वाढतील शुक्राणू))

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या …