पंतची स्टंपिंग पाहून धोनीलाही वाटेल अभिमान, दिनेश कार्तिककडून खास शब्दात कौतुक

Dinesh Karthik Praised Rishabh Pant : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील चितगाव येथे पार पडलेल्या कसोटी सामन्यात भारताच्या सर्वच खेळाडूंनी कमाल प्रदर्शन करत भारताला विजय मिळवून दिला. यावेळी ऋषभ पंतने देखील शानदार स्टंपिंगचं दर्शन घडवलं. त्यानं नुरुल हसनची केलेली स्टंपिंग पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं. अनुभवी यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) देखील पंतची स्टंपिंग पाहून खूप आनंद झाला. तो म्हणाला, ”पंतने नुरुल हसनला ज्या चपळाईने बाद केलं, ते पाहून महेंद्रसिंग धोनीला नक्कीच आनंद झाला असेल.  

नुरुल हसनला आऊट करार देण्यापूर्वी कार्तिकने ऋषभ पंतचं शानदार प्रदर्शन आणि भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिल्याबद्दल कौतुक केलं. क्रिकबझशी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, “सर्वप्रथम, मला वाटतं की पंत एमएस धोनीला आदर्श मानतो, तो तशाच प्रकारची स्टंपिंग करतो त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.” विशेष म्हणजे पंत कायम येणाऱ्य़ा डिलेव्हरीसाठी तयार असतो,  तो आधीच आपले हात स्टंपच्या दिशेने आणतो आणि त्यामुळेच तो इतक्या वेगाने स्टंपिंग करु शकतो.

भारताचा 188 धावांनी दमदार विजय

हेही वाचा :  IND vs BAN: बांगलादेश संघाची घोषणा, मायदेशात भारताविरोधात करणार दोन हात, शाकिबचं पुनरागमन

News Reels

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतल्यावक सामन्यात भारतानं पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या 90 तर श्रेयस अय्यरच्या 86 धावांच्या जोरावर 404 धावसंख्या स्कोरबोर्डवर लावली. ज्यानंतर कुलदीपनं कमाल गोलंदाजी करत 5 तर सिराजनं 3 विकेट घेत अवघ्या 150 धावांवर बांगलादेशचा डाव आटोपला. ज्यानंतर पुजारा आणि गिलच्या शतकाच्या जोरावर भारतानं 258 धावा करत दुसरा डाव घोषित केला आणि 513 धावांचं मोठं आव्हान बांगलादेशला दिलं. जे पूर्ण करताना बांगलादेशनं झुंज दिली पण अखेर कुलदीप आणि अक्षर यांच्या फिरकीसमोर बांगलादेशचा संघ 324 धावांवर सर्वबाद झाला आणि भारत 188 धावांनी सामना जिंकला.


हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …