Parent Tips: थंडीत लहान मुलांना दही द्यावं का ? कसं आणि किती ? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट

health news: सध्या सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला आहे, वातावरणात गर्व वाढतोय अश्यात सर्दी पडसं खोकल्यासारखे आजार आपली डोकी वर काढतात. आणि मग पालकांची पंचाईत होते कि मुलांना काय खायला द्यावं आणि काय नको. दही आपल्या शरीराला अतिशय पोषक असा पदार्थ आहे, दह्यामध्ये प्रोटीन (protein)  प्रमाण हे सर्वाधिक असतं. दही आपण आपल्या रोजच्या  जेवणात नेहमी समावेश करायला हवा असा पदार्थ आहे पण थंडीत आणि मुख्यतः मुलं आजारी पडल्यावर त्यांना दही द्यायचं कि नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत . 

दही तसं थंड प्रवृत्ती असते म्हणून दही देणं टाळलं जात पण तुम्हाला माहित आहे का , योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी दही खाल्लं तर ते अजिबात बाधत नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वर लिटिल चेरी मॉम म्हणून एक पेज चालवतात त्या लहान मुलांना तुम्ही कश्याप्रकारे खायला देऊ शकता आणि एकूणच त्यांच्या आरोग्याविषयी माहिती देतात. याच पेजवर त्यांनी थंडीमध्ह्ये मुलांना दही कश्या पद्धतीत खायला द्यायला हवं किंवा नाही ते सांगितलं आहे.  (Parenting Is it Fine to Offer Curd to Kids in winter)

हेही वाचा :  Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय परिस्थिती?

१. मुख्यतः आपल्याकडे लहान मुलांना सहा महिने झाल्यावर त्यांना अन्न द्यायला सुरु करतो,आणि सहा महिन्यांनंतर दही द्यायलासुद्धा काहीच हरकत नाहीये. 

२. फ्रिजमधून काढलेले थंड दही मुलांना लगेच देऊ नका एकदा ते रूम टेम्परेचर वर आले कि तुम्ही देऊ शकता. 

३. नुसतं दही खाण्यापेक्षा त्याला मोहरी हळद हिंग आणि कडीपत्ता यांची फोडणी देऊन ते देऊन शकता. यात हवं तर मिरपूड आणि काळ मीठ घालू शकता 

४. दह्यामध्ये आवळा पावडर घालून त्याला फोडणी देऊ शकता थंडीत दही खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते. 

५. नुसतं दही देण्याऐवजी त्यात तीन पट पाणी घालून त्याचे ताक बनवून ते देऊ शकता हे ताक रोज दिल तरी काहीच हरकत नाही. दही उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात ते द्यायला हरकत नाहीये.

६. मुलांसाठी दही बनवत असाल तर विरजण लावताना ते सोयीच्या दुधात लावेल तर ते आणखी ऊत्तम त्यामुळे दुधातील फॅट्स मुलांना मिळतील त्यामुळे मुलांना पोषक तत्व आणखी मिळण्यास मद्दत होईल

७. दही कधीही चुकूनसुद्धा गरम करू नका मुलांना सर्दी कफ असेल तर अजिबात दही घालू नका. आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा दही आणि दूध कधीच एकत्र देऊ नका. त्यामुळे दही देताना या सर्व गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. ()

हेही वाचा :  OTT चं सबस्क्रिप्शन नसलं तरी 'या' प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येणार Webseries



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …