या स्टेप्सला फॉलो करून बनवा E-Shram Card, महिन्याला मिळवा ३ हजार, २ लाखाचा विमा संरक्षणही

नवी दिल्लीःE-Shram Card: भारत सरकारने देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच कामगार वर्गासाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा म्हणजेच ई-श्रम कार्ड आहे. या सरकारी सुविधा अंतर्गत असंघटीट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ई-श्रम कार्ड बनवले जाते. ई-श्रम कार्ड स्कीम द्वारे असंगटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात.

ई-श्रम कार्डचे फायदे
भारतात असे कोट्यवधी लोक आहेत. ज्यांना आपले ई-श्रम कार्ड बनवायचे आहे. या कार्डधारकांना भारत सरकारकडून २ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. जर कोणी कामगार काम करण्यास अक्षम झाल्यास त्याला एक लाख रुपये दिले जाते. २ लाखाच्या विमा संरक्षणासाठी एक रुपयाचेही प्रीमियम भरावे लागत नाही.

तसेच सरकारकडून श्रमिकाला ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रति महिना ३ हजार रुपये महिना पेन्शन दिली जाते. गरीब वर्गातील वयोवृद्धांसाठी हा मोठा दिलासा आहे. तसेच वेगवेगळे राज्य सरकार सुद्धा आपल्या ई-श्रम कार्ड धारकांना वेगवेगळे फायदे देत आहे. सध्या ई-श्रमिक कार्ड धारकांना ५०० रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा :  टीना दत्ताबद्दल आग ओकणाऱ्या श्रीजीता डेचे हे सिझलिंग फोटो

वाचाः 108MP कॅमेरा, 6000mAh ची बॅटरी, 32MP सेल्फी कॅमेरा, किंमत २० हजारांपेक्षा कमी, पाहा फोन्सची लिस्ट

ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी आवश्यक डॉक्यूमेंट

यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १६ वर्षे ते ५९ वर्षे या दरम्यान असायला हवे.
त्याच्याकडे स्वतःचे आधार कार्ड हवे.
आधार फोन नंबरला लिंक असणे गरजेचे आहे.
चालू बँक अकाउंट असणे गरजेचे आहे.
बँक केवायसी असणे गरजेचे आहे.
ई-श्रम कार्डसाठी अर्ज करणारा व्यक्ती EPFO/ESIC or NPS चा सदस्य नसावा.

वाचाः SBI Internet Banking वापरणाऱ्यांनो लक्ष द्या, ‘या’ चुकांची मोजावी लागेल मोठी किंमत, असे राहा सेफ

ऑनलाइन नोंदणी कशी कराल
वर सांगितलेल्या आवश्यक सर्व गोष्टीचे पालन करावे. तुम्ही तीन प्रकारे ई-श्रम कार्ड साठी अर्ज करू शकता.
ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला http://eshram.gov.in या लिंकवर जावे लागेल. या ठिकाणी सर्व फॉर्म भरावा लागेल.
यानंतर तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटवर जावून सुद्धा नोंदणी करू शकता.
प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारच्या कार्यालयात जावून ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकता.

वाचाः Jio 395 Plan: जिओचा मस्त प्लान, ८४ दिवसाची वैधता, डेटा कॉलिंगसह OTT फ्री

हेही वाचा :  सदावर्तेंचं वादग्रस्त विधान! म्हणाले, 'पवारांचे विचार नथुरामच्या पायाची धूळही नाहीत, गांधींचा विचारही...'

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …