जिम जॉईन करण्याआधी Health Checkup केल्यामुळे टळू शकतो Heart Attack चा धोका

कोविड-19 मुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की शरीराचा कोणताही भाग या विषाणूच्या प्रभावापासून वाचू शकला नाही. कोरोनानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी सकस आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा, या तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही लोक जिममध्येही जाऊ लागले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जिममध्ये होत असलेल्या एकामागून एक आकस्मिक मृत्यूंमुळे व्यायामाबाबत अनेक चिंताजनक प्रश्न निर्माण झाले आहेत. यातील एक प्रश्न म्हणजे जिम सुरू करण्यापूर्वी आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे का? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून काय खरं काय खोटं?

जिम जॉईन करण्याआधी हेल्थ चेकअप करा

जिममध्ये जाण्यापूर्वी आरोग्याची तपासणी करावी की नाही याविषयी मॅक्स हॉस्पिटल गुरुग्रामचे सीनियर डायरेक्टर आणि एचओडी इंटरनल मेडिसिन अँड मेडिकल डायरेक्टर डॉ. राजीव डांग सांगतात की, अतिव्यायाम आणि औषधे किंवा सप्लिमेंट्स घेत असलेल्या लोकांना याची गरज असते.

हेही वाचा :  कधीच येत नाही हार्ट अटॅक, खा रक्ताच्या गाठी फोडून रक्त पातळ करणारी ही घरगुती चटणी

(वाचा :- Lung Cleansing Food: फुफ्फुसांना चिकटलेली घाण व विषारी कण होतील नष्ट, मजबूत-स्वच्छ फुफ्फुसासाठी खा हा 1 पदार्थ)

जिम जॉईन करण्याआधी माहित हवी शारीरिक क्षमता

डॉ.डांग सांगतात की, व्यायामाशी संबंधित कोणतीही योजना बनवण्यापूर्वी तुमच्या शरीराची क्षमता जाणून घेतली पाहिजे. मी हे सांगतो कारण मी सप्लिमेंट घेत असलेल्या तरुण मुलांमध्ये मूत्रपिंडाच्या बिघाडाची म्हणजेच रिनल डिस्फंकशनची अनेक प्रकरणे पाहिली आहेत. फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटल, फरीदाबादचे जनरल सर्जरी संचालक डॉ. ब्रह्म दत्त पाठक म्हणतात की, आरोग्याची तपासणी संपूर्ण शरीराबाबत खोलवरची माहिती किंवा शरीर कोणत्या स्थितीत आहे हे अगदी निश्चितपणे सांगते, ज्यामुळे व्यायामाचा प्रकार निवडणे सोपे होते.

(वाचा :- Cancer व Cholesterol हे भयंकर आजार मुळापासून संपवतात या 5 भाज्या, अमेरिकन डॉक्टरांनी सांगितले जबरदस्त फायदे)

जिम सुरू करण्याआधी कोणत्या टेस्ट कराव्यात?

डॉ. डांग स्पष्ट करतात की जिमला जाण्यापूर्वी वाइटल पल्स महत्त्वाच्या नाडी, रक्तदाब, SPO2, ब्लड शुगर आणि शरीरातील इतर अवयव जसे की CBC, मूत्रपिंडाचे कार्य आणि लिव्हरचे कार्य यासह कार्डियाक आणि पल्मोनरी प्रोफाइल टेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाईल, थायरॉईड प्रोफाइल, ईसीजी यांसारख्या रक्ताच्या तपासण्याही कराव्यात.

हेही वाचा :  Weak Heart Sign : हृदय कमजोर होताच दातांमध्ये दिसतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या ५ महत्वाच्या गोष्टी

(वाचा :- Weight Loss: कानाकोप-यात जाऊन जाळेल पोट, कंबर, मांड्यांची जिद्दी चरबी, झपाट्याने होते वेटलॉस, खा हा एक पदार्थ)

ट्रेनरला द्या मेडिकल कंडिशनची माहिती

अपोलो हॉस्पिटल्स अहमदाबाद येथील कन्सल्टंट इंटरनल मेडिसिन डॉ विरल पटेल म्हणतात, “एखाद्या व्यक्तीला पाठदुखी किंवा मणक्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्यांनी तपासणी करून घ्यावी जेणेकरून जिम ट्रेनरला कळेल की तुमच्यासाठी कोणते व्यायाम योग्य आहेत किंवा फायदेशीर ठरतील.” याशिवाय तुमची काही मेडिकल हिस्ट्री असेल तर तिही ट्रेनरला नक्की सांगा.

(वाचा :- Manuka Water : पोट साफ न होणं, मुळव्याध, गॅस-अपचन, आतडे-पोटाच्या सर्व समस्यांतून व्हाल मुक्त, प्या हे खास पाणी)

वर्कआउटे फायदे आणि नुकसान

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वजन कमी करणे आणि वजन वाढवणे यापेक्षा वर्कआउटचा रेसपिरेटरी फिटनेस, स्नायू टोनिंग, ताकद, मानसिक संतुलन यांच्याशी जास्त संबंध आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकीचे किंवा जास्त वेळ वर्कआउट केले तर ते फायद्याऐवजी नुकसानही करू शकते.

(वाचा :- How To Purify Blood Naturally : रक्तातील विषारी पदार्थ व घाण एका झटक्यात फेकतील शरीराबाहेर, फक्त करा हे 6 उपाय)

हेही वाचा :  गृहिणींची फोडणी महागणार; टोमॅटो, हिरव्या भाज्यांनंतर लसूणाचे दर वाढले, एक किलो तब्बल...

वर्कआउटच्या या सवयी आहेत अनहेल्दी

जर तुम्ही फिटनेस फ्रीक होण्यासाठी आठवडाभर व्यायाम करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी खूप जास्त होऊ शकते. व्यायाम करण्याआधी वॉर्मअप करायला कधीच विसरू नका. वर्कआउट करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच व्यायामापूर्वी आणि नंतर शरीराला योग्य विश्रांती देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कोणत्याही ट्रेंडचे आंधळेपणाने अनुसरण करण्याऐवजी आपल्या क्षमतेनुसार वर्कआउट निवडणे कधीही चांगले असते.

(वाचा :- Liver Detox Naturally: लिव्हर फेल व सडण्याचा धोका होईल कायमचा दूर, हे पदार्थ करतात लिव्हरचा प्रत्येक कोना साफ)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …