गर्भारपणात येत असेल नैराश्य तर आहेत ५ लक्षणे, बाळावर काय होतो परिणाम घ्या जाणून

आजकाल अनेक व्यक्तींना नैराश्याला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. जो अनेक आठवडे, महिने आणि वर्षांपर्यंत एखाद्या माणसासाठी त्रासदायक ठरू शकतो. काही व्यक्तींना औषधांशिवाय केवळ बोलण्याने यातून बाहेर पडता येते. तर काही जणांना औषधांची गरज भासते. नैराश्य हे मानसिक त्रासासह शारीरिक स्वरूपानेही प्रभावित करते. पीडित व्यक्तीचा संपूर्ण दिवस त्याच्या या मानसिक त्रासावर अवलंबून असतो. पण गर्भावस्थेदरम्यानही डिप्रेशन येते. गर्भवती महिलांना याची जाणीव होत नाही. गर्भावस्थेदरम्यान उदास राहणे, निराश होणे, चिंता करणे अशी अनेक लक्षणे महिलांमध्ये दिसून येतात. याबाबतीत अधिक माहिती.

गरोदरपणातील नैराश्याची लक्षणे

प्रेगन्सीमध्ये येणारे डिप्रेशन हे सामान्य व्यक्तीच्या नैराश्यापेक्षा थोडे वेगळे असते. गरोदरपणात येणाऱ्या नैराश्याचा परिणाम हा महिलांच्या भविष्यावर तर पडतोच. पण त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावरही होऊ शकतो. गरोदरपणात महिलांमध्ये अशी काही लक्षणे दिसतात, ज्यामुळे त्यांना नैराश्य आले आहे हे कळते. गर्भावस्थेतील नैराश्याची काही महत्त्वाची लक्षणे आपण जाणून घेऊ.

मन उदास राहणे

गर्भवास्थेतील नैराश्यामुळे महिलांचे मन सतत उदास राहते. त्यांना बराच वेळ एकटं राहणं आवडायला लागतं आणि कोणत्याही गोष्टीचा आनंद अशा महिला घेऊ शकत नाहीत. या परिस्थितीत महिला दुःखी, उदास आणि शांत राहतात. या लक्षणांची आपल्याला माहिती करून घेतली गर्भवती महिला नैराश्यात आहे हे स्पष्ट होते. तुमच्या घरातही कोणतीही महिला गर्भवती असेल आणि तिला उदासीनता आली असेल अथवा एकटे राहावेसे वाटत असेल तर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायला हवा. तिच्या कलेकलेने घेऊन तिच्यातील ही उदासीनता झटकून टाकायला मदत करावी.

हेही वाचा :  लंडनमध्ये शिक्षणासाठी गेला होता शेतकऱ्याचा मुलगा; महिन्याभराने नदीत सापडला मृतदेह

(वाचा – नॉर्मल वा सीझर डिलिव्हरीनंतर ओल्या बाळंतिणीने काय काळजी घ्यावी)

खूप कमी अथवा अति जेवण सेवन करणे

गरोदरपणात महिलांना अनेक वेगवेगळे खाद्यपदार्थ खावेसे वाटतात. याला डोहाळे लागणं असंही म्हटलं जातं. तर काही महिलांना सतत मळमळ आणि उलट्या होत असल्याने जास्त खावेसे वाटत नाही. पण ज्या महिलांना गरोदरपणात नैराश्य आले आहे त्या महिला जास्त जेवतात अथवा एकदम कमी खातात. या लक्षणावरून डिप्रेशनबाबत जाणून घेता येते. या परिस्थितीत महिला सामान्य माणसांच्या तुलनेत अधिक अथवा कमी खातात हे लक्षात ठेवा.

थकवा वा कमजोरी जाणवणे

गर्भावस्थेत तसं तर महिलांना आधीच थकवा अथवा शरीरात कमजोरी जाणवणं हे कॉमन आहे. पण नैराश्याचेही हे एक लक्षण आहे. सतत थकवा जाणवत असेल तर वेळीच त्याकडे लक्ष द्यायला हवे. गरोदरपणात नैराश्य आले असेल तर महिलांच्या चेहऱ्यावर थकवा आणि निस्तेजता दिसून येते. थोडं काम करूनही महिलांना अधिक थकायला होतं. तसंच शरीरात अजिबात ताकद राहात नाही आणि कोणतंही काम करण्याची इच्छाही राहात नाही. जराजराशा गोष्टीत चिडचिडही वाढते. असे लक्षण दिसले तर वेळीच काळजी घ्यावी.

(वाचा – कोणत्या महिन्यात द्यावी ‘गुड न्यूज’, का करू नये घाई)

अधिक झोप वा अनिद्रेची समस्या

गरोदर महिला नऊ महिन्यात भरपूर झोपतात अथवा अनिद्रेची समस्याही होते. हे दोन्ही डिप्रेशनची लक्षणे आहेत. कोणत्याही व्यक्ती ९-१० तास झोपू शकतात. पण यापेक्षा अधिक झोप घेणे हे सामान्य माणसाचे लक्षण नाही. गर्भावस्थेच्या स्थितीत हे डिप्रेशनचे लक्षण असू शकते. तुम्हाला गरोदर असताना अधिक झोप येत असेल अथवा अनिद्रेची समस्या असेल तर हे लक्षण नैराश्याचं आहे हे समजून घ्या.

हेही वाचा :  सॅमसंग स्मार्टफोन युजर द्या लक्ष, या टिप्स तुमच्या डिव्हाइसला ठेवतील Over Heating पासून सुरक्षित

विनाकारण रडायला येणे

गरोदरपणात कधी कधी विनाकारण महिला रडतात. त्यांनाही याची कल्पना नसते की रडण्याचे नक्की कारण काय आहे. पण हे नैराश्याचे एक लक्षण आहे. बरेचदा कोणत्याही कारणाशिवाय महिला उदास होतात आणि निराश होतात आणि रडू लागतात. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्यांनाही याचे कारण कळत नाही. त्यामुळे नैराश्याच्या बाबतीत हे जाणून घ्यायला हवे. महिला याचे कारण सांगूही शकत नाहीत तेव्हा त्यांना नैराश्य आले आहे हे समजून जावे आणि वेळीच डॉक्टरांची मदत घ्यावी.

गरोदरपणातील नैराश्याची कारणे

  • ज्या महिला पहिल्यापासूनच नैराश्य आणि बायपोलर डिसऑर्डरच्या रूग्ण आहेत
  • पहिल्या गरोदरपणानंतर नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या महिला
  • अनुवंशिक मानसिक विकाराचा इतिहास
  • घरातून पाठिंब्याची आणि मानसिक आधाराची कमतरता
  • धुम्रपान अथवा दारूचे सेवन

नैराश्याचा गरोदरपणावर होणारा परिणाम

नैराश्यामुळे गरोदरपणावरही वाईट परिणाम होतो. नैराश्य अनेक पद्धथीने गरोदरपणावर परिणाम करत असते. गर्भावस्थेमध्ये नैराश्यामुळे गर्भपात होऊ शकतो. याशिवाय Postpartum Depression च्या कारणामुळेही त्रास होतो. गरोदरपणानंतरही नैराश्याचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये मुलांचे योग्य पालनपोषण न होणे, मुलांना सांभाळण्याची आपल्यात क्षमता नाही असे वाटणे, अत्याधिक चिंता, तणाव, निर्णयक्षमतेत कमी पडणे, नेहमी औदासिन्य जाणवणे, निराश होणे असे अनेक प्रकार दिसून येतात. इतकंच नाही तर काही महिला भविष्यात आपल्या स्वतःवरही नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. इतका गंभीर परिणाम नैराश्याचा दिसून येतो.

नैराश्याचा बाळावर होणारा परिणाम

गरोदरपणात नैराश्य आल्यास बाळावरही परिणाम होतो. गर्भावस्थेमध्ये महिलांना नैराश्याचा सामना अधिक करावा लागल्यास बाळाचा वेळेआधी जन्म अर्थात Preterm Birth होऊ शकतो. याशिवाय बाळ कमी वजनाचेही जन्माला येऊ शकते. इतकंच नाही तर नैराश्यावर वेळीच इलाज केला गेला नाही तर गरोदरपणातील नैराश्यामुळे बाळाच्या जीवालाही धोका संभवतो. गर्भपात होण्याची शक्यता असते. आईची मानसिक स्थिती ही बाळाच्या आरोग्यावर परिणाम करत असते. ज्याचा परिणाम बाळाला पुढे अनेक काळ सहन करावा लागू शकतो. तसंच बाळाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही याचा गंभीर परिणाम दिसून येतो. जन्मानंतर बाळ आपल्या आईशी तितकेसे अचॅट राहात नाही आणि आईच्या जवळ राहण्याचाही त्याला त्रास होऊ शकतो. तसंच पुढे बाळाला आईच्या अशा मानसिक आरोग्यामुळे स्वतःलाही मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो.

हेही वाचा :  ऐन दिवाळीत नोकरीवर गदा; 'या' बड्या कंपन्यांमधून शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ

तुम्ही गरोदर असलात आणि तुम्हाला यापैकी काहीही लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. भविष्यात तुम्हाला आणि तुमच्या बाळाला यामुळे धोका संभवू शकतो. लक्षणे जाणवल्यावर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. तसंच आपल्या कुटुंबाशी याबाबत मनमोकळेपणाने बोलून त्यांचा आधार घ्या.

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratime.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …