व्हॉट्सअॅपवरुन व्हिडिओ कॉल आलाय? लगेच रिसिव्ह करु नका, वाचा नक्की काय घडलं

WhatsApp Fake Call: गेल्या काही दिवसांपूर्वी केरळमधील एका व्यक्तीसोबत सायबर फ्रॉड झाला होता. आत्तापर्यंत तुम्ही सायबर क्राइमचे अनेक प्रकार ऐकले असतील. मात्र अलीकडेच AIच्या मदतीनेही लोकांना लुबाडले जाते. केरळमध्ये अलीकडेच समोर आलेल्या एका प्रकरणात एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप कॉल आला होता. पीडित व्यक्तीच्या ओळखीत असलेल्या एका माणसाचा फोन आला होता. त्याने पैशांची मागणी केली. मात्र नंतर लक्षात आले की की तो फोन कॉल फ्रॉडअसून AIच्या मदतीने करण्यात आला होता. 

अशा परिस्थितीत तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. शेवटी, AIच्या मदतीने फेक व्हिडिओ कॉल कसा येतो? ते लोकांना कसा गंडा? याबाबत स्पष्टीकरण देताना सायबर तज्ज्ञ डॉ.पवन दुग्गल म्हणातात की, AI चा उपयोग सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे केला जातो. सायबर फसवणूक करणार्‍यांसाठी AI देखील खूप उपयुक्त ठरत आहे. 

AI फेक कॉल?

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून लोकांचा विश्वास जिंकला जाऊ शकतो. या प्रकारच्या बनावट व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल येतो. तुम्ही नीट लक्ष्य देऊन पाहिले तरच, हा व्हिडिओ कॉल खोटा किंवा मॉर्फ केलेला असल्याचे तुमच्या लक्षात येईल. एकदा का तुमचा विश्वास बसला की तुम्ही पैसै पाठवण्यास तयार व्हाल. कॉल करून पैसे पाठवले की तुम्ही सायबर फसवणुकीचे बळी व्हाल.

हेही वाचा :  AUS vs WI : ऐतिहासिक विजयानंतर ब्रायन लारा यांच्या डोळ्यात पाणी, म्हणाले 'माझा विश्वास...'

फेक कॉल आहेत हे कसे ओळखाल?

जर तुम्हाला कोणाचाही कॉल आला तर सर्वप्रथम तुम्ही हा विचार केला पाहिजे की ज्याने व्हिडिओ कॉल केला आहे ती व्यक्ती तुम्हाला अनेकदा कॉल करते किंवा बऱ्याच दिवसांनी कॉल आला आहे का. जी व्यक्ती तुम्हाला दररोज व्हिडीओ कॉल करत नाही, तर तुम्ही त्या व्हिडिओ कॉलकडे दुर्लक्ष करावे हे पहिले लक्षण आहे. जर व्हिडिओ कॉल तुमच्या जवळच्या व्यक्तीचा असेल, तर तो कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर, तुम्ही त्यांना एकदा कॉल करून त्याची पुष्टी केली पाहिजे. 

फेक व्हिडिओ कॉलमध्ये ओठांची हालचाल खूप महत्त्वाची आहे. कारण सायबर घोटाळेबाज एका अॅपच्या माध्यमातून ऑडिओ बसवतात, त्यामुळे तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा आवाज येतो पण ओठांची हालचाल अगदी खोटी आहे. ते सहज ओळखता येते.

व्हॉट्सअॅपचे नवे फिचर

व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही अनोळखी कॉल सायलेंट करू शकता. फसवणूक टाळण्यासाठी हे वापरले जाऊ शकते. व्हॉट्सअॅपच्या सर्व फीचर्सबद्दल बहुतांश लोकांना अजूनही माहिती नाही. व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही हे फीचर सेट करू शकता.

हेही वाचा :  स्मार्टफोन विकतांना जरा सांभाळूनच ! खरेदी करणारा सहज मिळवू शकतो तुमचे Deleted Photos, पाहा डिटेल्स



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …