सध्या चर्चेत असलेले ChatGPT चॅटबॉट आहे तरी काय? ते Android वर कसे वापरायचे? पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ChatGPT On Android: आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च कंपनी OpenAI ने AI आधारित चॅटबॉट ChatGPT सादर केला आहे. हा चॅटबॉट मशीन लर्निंग आणि GPT-3.5 नावाचे भाषा मॉडेल वापरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. सध्या हा टॅचबॉट लिखित स्वरूपात प्रश्नांची उत्तरे देतो. महत्वाचे म्हणजे या AI आधारित चॅटबॉटच्या मदतीने अनेक प्रकारची कामे सहज करता येतात आणि कोडही लिहिता येतात. चॅटबॉट अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासही सक्षम आहे. Android फोनमध्‍ये AI आधारित चॅटबॉट ChatGPT कसे वापरायचे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: बॅटरी बॅकअपचे टेन्शन विसरा, या स्मार्टफोन्सची बॅटरी लवकर संपतच नाही, पाहा किंमत फीचर्स

Android मध्ये ChatGPT AI Chatbot कसे वापरायचे?

ChatGPT सध्या Google Play Store आणि Apple च्या App Store वर उपलब्ध आहे. युजर्स सध्या Open AI च्या वेबसाइटवर ChatGPT चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकतात. हे GPT-3 API वर आधारित आहे. अँड्रॉईड युजर्स स्मार्टफोनवर इन्स्टॉल केलेल्या ब्राउझरच्या मदतीने हा चॅटबॉट वापरू शकतात.

वाचा: काय सांगता! लाखांच्या घरात किंमत असलेला हा ६५ इंचाचा Smart TV ३१ हजारात खरेदी करता येणार

हेही वाचा :  Motorola Edge 30 Pro ची आज भारतात पहिली विक्री, जाणून घ्या अधिक तपशील

OpenAI अकाऊंट कसे सेट करायचे याबद्दल जाणून घेऊया:

सर्वप्रथम तुमच्या डिव्हाइसवर इंस्टॉल Chrome ब्राउझर उघडा. OpenAI ची अधिकृत वेबसाइट उघडा. येथे तुम्हाला ChatGPT ट्राय बटण दिसेल. त्यावर टॅप करा. नंतर लॉगिन पेज उघडेल. ईमेल अॅड्रेस आणि पासवर्डच्या मदतीने खाते तयार करा. यानंतर तुम्हाला ईमेल अॅड्रेस व्हेरिफाय करावा लागेल. तुम्हाला वेबसाइटवर तुमचा फोन नंबर व्हेरिफाय करण्यास सांगितले जाईल. यानंतर तुम्हाला तुमचे खाते सेट करावे लागेल. यानंतर तुम्ही चॅट बॉटला कोणताही प्रश्न विचारू शकता.

सध्या iOS Devices साठी ChatGPT चॅटबॉटसाठी कोणतेही स्वतंत्र अॅप उपलब्ध नाही. iPhone, iPad युजर्स अधिकृत OpenAI वेबसाइटवरून ChatGPT AI चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकतात.

वाचा: १२ हजारांमध्ये घरी न्या ‘हा’ Bestseller फोन, फोनमध्ये ५० MP Camera, 128GB स्टोरेज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …