फोनचे Bluetooth नेहमी ऑन असते ? मिनिटात होऊ शकते डिव्हाइस Hack,असे राहा सेफ

नवी दिल्ली: Hacking: ब्लूटूथ सर्व फोनमध्ये असते आणि बरेच लोक ते सतत वापरतात सुद्धा. स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपमध्ये Bluetooth आधीच दिलेले आहे. एका डिव्‍हाइसवरून दुस-या डिव्‍हाइसमध्‍ये फाइल ट्रान्सफर करण्‍यासाठी ब्लूटूथची आवश्‍यकता असते. पण तुम्हाला माहित आहे का ? डिव्हाइसमध्ये असलेले ब्लूटूथ जितके सोयीस्कर आहे तितकेच ते धोकादायक सुद्धा असू शकते. हॅकर्स ब्लूटूथद्वारे तुमचे डिव्हाइस हॅक करू शकतात. त्याला ब्लूबगिंग असेही म्हणतात. ब्लूटूथ हॅकिंग कसे केले जाते आणि त्यापासून तुम्ही कसे सुरक्षित राहू शकता याबद्दल ही महत्वाची माहिती.

वाचा: Samsung Galaxy M13 वर मिळतेय सुपरहिट ऑफर, आतापर्यंत २० लाख ग्राहकांनी केला खरेदी फोन

Bluetooth हॅकिंग कसे काम करते?

हॅकर्स एक विशिष्ट सॉफ्टवेअर वापरतात, जे आपोआप ब्लूटूथने सुसज्ज असलेली उपकरणे शोधतात. हॅकर्स हे देखील पाहू शकतात की, तुमचे डिव्हाइस आधी कोणत्या नेटवर्कशी कनेक्ट केले गेले आहे. फोन आधीपासून कनेक्ट केलेले नेटवर्क पुरेसे विश्वासार्ह मानतो आणि भविष्यात त्यांच्याशी आपोआप कनेक्ट होतो.

वाचा: पाहा Flipkart सेलमधील टॉप १० स्मार्ट टीव्ही डील्स, ५० इंच मॉडेल मिळतेय ७६९९ रुपयांमध्ये

हेही वाचा :  तारीख लिहून ठेवा! 'या' दिवसानंतर तुमच्या मोबाईलमधलं WhatsApp होणार बंद

सायबर गुन्हेगारांना तुमच्या डिव्हाइसचे विश्वसनीय नेटवर्क माहित असल्यास, ते त्याद्वारे तुमच्या डिव्हाइसशी कनेक्ट होतात. यानंतर तुमचे डिव्हाइस हॅक होते. त्यानंतर हॅकर्स डिव्हाइसमध्ये मालवेअर इन्स्टॉल करतात. याद्वारे हॅकर्स तुमची हेरगिरी करतात. तुमचे मेसेजेस वाचतात आणि डेटा देखील चोरू शकतात.

यापासून सुरक्षित कसे राहायचे?

डिव्हाइस वापरात नसताना ब्लूटूथ डिसेबल करा. तुम्हाला फाइल्स ट्रान्सफर करायच्या असतील तर, तुम्ही Air Drop किंवा Fast Share वापरू शकता. ब्लूटूथ सेवांची प्रवेशक्षमता मर्यादित करा. हे ब्लूबगिंग टाळते. तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट आणि ब्लूटूथ सक्षम संगणकांवर तुमच्याकडे अँटीमालवेअर अॅप स्थापित असल्याची खात्री करा. एखाद्या हॅकरने तुमच्या डिव्हाइसमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्यास, अँटी-मालवेअर अॅप तुमची गोपनीयता आणि वैयक्तिक डेटा संरक्षित करताना संशयास्पद ऍक्टीव्हीटीज शोधू आणि ब्लॉक करू शकतो.

वाचा: लेटेस्ट स्मार्टफोन लाँच ते CES 2023, हे आहेत गेल्या आठवड्यातील महत्वाचे टेक अपडेट्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …

Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येराज्याच्या कोकण किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी …