व्हायरल व्हिडीओत मोठा ट्विस्टः नवी मुंबईत रेल्वेखाली पडणारा ‘तो’ गर्लफ्रेंडची हत्या करून आलेला!

Navi Mumbai Viral Video Twist:  नवी मुंबईतून एक लोकलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यात व्हिडिओत तो व्यक्ती फोनवर बोलताना रेल्वे रुळ ओलांडत असताना अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. प्रियकरानेच प्रेयसीची हत्या करत स्वतः आत्महत्या केल्याचे नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या आत्तापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. 

नवी मुंबईतील कळंबोली मध्ये राहणाऱ्या प्रियकराने घराजवळच राहणाऱ्या आपल्या प्रेयसीचा गळा आवळून हत्या करत स्वतः देखील रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय वैष्णवी बाबर आणि 24 वर्षीय वैभव बुरुंगले यांच्यात मागील पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यात खटके उडत होते. याच वेळी वैभवच्या मनात संशयाने घर केले आणि मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात वैभव ने वैष्णवीची हत्या करण्याचा कट रचला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीची हत्या करणार, कुठे करणार, कशी करणार या सर्व बाबी वैभवने आधीच आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवल्या होत्या. त्याप्रमाणे वैभवने वैष्णवीला खारघर हिल येथे घेऊन गेला होता. तिथे त्याने तिची गळा आवळून हत्या केली. वैष्णवीच्या हत्येनंतर तो तिथून निघाला आणि जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. 

हेही वाचा :  Karnataka Results: "अरे, पवार साहेबांनी तिथे...", फडणवीसांचा कर्नाटक निकालावरुन टोला; उद्धव ठाकरेंनाही डिवचलं

मोबाईलवर बोलता बोलता रेल्वे रुळांवर उतरला अन्…, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

वैभवच्या आत्महत्येचा तपास करत असताना त्याच्या मोबाईल मध्ये आपण वैष्णवीची हत्या केल्याची कबुली त्याने लिहून ठेवली होती. त्यासोबतच LO1-501 हा सांकेतिक क्रमांक लिहून ठेवला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत खारघर हिल परिसरात सात दिवस शोध मोहीम राबविली. अखेर तो संकेतीक क्रमांक म्हणजे झाडाचा क्रमांक असल्याचे निष्पन्न झाल्यावर ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी शोध घेतला. तेव्हा पोलिसांना वैष्णवीचा मृतदेह आढळून आला. या घटनेचा नवी मुंबई पोलिसांनी मोठया शिताफिने तपास करत हत्या आणि आत्महत्येचा उलगडा केला आहे. 

व्हायरल व्हिडिओत काय?

नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकात  एक व्यक्ती मोबाईलवर बोलत असताना रेल्वे रुळांवर उतरते. तितक्यात समोरुन भरधाव ट्रेन येत होती. त्या व्यक्तीला ट्रेन धडक देत पुढे निघून गेली. लोकलचा अपघात इतका भीषण होता की त्याच्या शरीराचे तीन तुकडे झाले. या घटनेनंतर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या लोकांनी तात्काळ आरडाओरडा केली. व ही  घटना रेल्वे अधिकारी गजेंद्र सिंग यांना कळवण्यात आली.  त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली मात्र तोपर्यंत त्याच्या शरीराचे तीन तुकडे झाले होते. या घटनेत व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा :  Mother's Day 2023 : आई सारखं दैवत नाही! परीक्षा खोलीत तान्हुल्यास स्तनपान करत सोडवला पेपर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …