विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात शाळांना ‘इतके’ दिवस सुट्ट्या

School Holiday List: सुट्टी हा शाळेतल्या विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय असतो. नाताळची मोठी सुट्टी संपवून नव वर्षात शालेय विद्यार्थी पुन्हा शाळेत जाऊ लागले आहेत. वर्षाअखेरीस आई-वडिलांनाही या काळात सुट्टी असल्याने संपूर्ण परिवाराने फूल टू धम्माल केली असेल. दरम्यान आता जानेवारी महिन्यात देखील विद्यार्थ्यांना अनेक सुट्ट्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे. असे असले तरीही अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायला हवी.

यावर्षी रविवारपासून २०२३ वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला शाळा आणि महाविद्यालये बंद होती. विद्यार्थी त्यांच्या मित्रांसोबत बाहेर जाऊन नवीन वर्षाची पार्टी साजरी करू शकतात. विशेष म्हणजे यंदा जानेवारीमध्ये ५ रविवारसह अनेक दिवस सुट्टी आहे. ज्यामध्ये विद्यार्थी प्रवासासोबतच अभ्यासाचे प्लानिंग देखील बनवू शकतात.

विशेष म्हणजे सीबीएसई बोर्डासह अनेक राज्यांमध्ये बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षांच्या तयारीच्या दृष्टीने जानेवारी महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थी आपल्या सुट्टीनुसार विषयनिहाय आराखडा तयार करु शकतात. याचा फायदा त्यांना आगामी परीक्षांमध्ये मिळू शकेल.

हेही वाचा :  School Closed: कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार? शिक्षण आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

शांळांना सुट्ट्यांचे दिवस

१ जानेवारी – रविवार
८ जानेवारी – रविवार
१४ जानेवारी – मकर संक्रांती
१५ जानेवारी – रविवार
२२ जानेवारी – रविवार
२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन
२९ जानेवारी – रविवार

हिवाळी सुट्टीमुळे शाळा बंद

कडाक्याच्या थंडीमुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये शाळा बंद आहेत. याशिवाय अनेक राज्यांमध्ये शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. थंडीची लाट पसरल्याने लहान मुले घरीच आहेत. या दरम्यान या काळात तेथील विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेची चांगली तयारी करता येणार आहे.

शाळकऱ्यांना नव्या वर्षाचं गिफ्ट, शहरात बनणार ‘विद्यार्थी प्राधान्य रस्ते’

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …