उरण शहरात नागरी सुविधांचा अभाव | civic amenities Uran city Statement water scarcity ysh 95


शहरात भेडसावणाऱ्या नागरी सुविधांबाबत शेकापच्या वतीने मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन देण्यात आले.

मुख्याधिकारी यांना शेकापचे निवेदन 

उरण : शहरात भेडसावणाऱ्या नागरी सुविधांबाबत शेकापच्या वतीने मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन देण्यात आले. उरण शहरात जानेवारी महिन्यापासून मंगळवार व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी रानसई धरणाव्यतिरिक्त हेटवणे किंवा मोरबे धरणांचा अतिरिक्त पाणीसाठा घेऊन उरणकरांची तहान भागवावी, अशी मागणी करण्यात आली.

 शहरात वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात होत आहे. आनंदनगर ते राजपाल नाका कोटनाका या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते मोकळे होण्यासाठी सुनिश्चित धोरण आखावे. कोटनाका ते कोर्टापर्यंत बायपास रस्ता यामधील अडचणी दूर करून हा रस्ता तयार झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांवर  कारवाई करावी. धुळीवडा येथे पाण्याची नवीन वाहिनी टाकावी, पाण्याची गळती रोखावी तसेच कीटकनाशक फवारणी करावी.  पावसाळय़ाआगोदर नालेसफाई करावी इत्यादी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी शेकाप शहर चिटणीस शेखर पाटील तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर, शहर अध्यक्षा नयना पाटील, शहर उपाध्यक्ष रंजना पाटील, शहर सहचिटणीस चिंतामण गायकवाड, शहर पदाधिकारी शंकर भोईर,  नारायण पाटील, दिलीप पाटील,  कोंडस्कर, किशोर घरत उपस्थित होते.

हेही वाचा :  Year Ender 2023 : कंडोम, मखाना व कांदा..! 2023 मध्ये भारतीयांनी स्विगीकडून सर्वाधिक काय ऑर्डर केलं?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …