लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड
प्रदीप पटवर्धन यांचे जवळचे मित्र विजय पाटकर यांनीच हा किस्सा सांगितला होता. मोरुची मावशी नाटक यशाच्या शिखरावर असताना प्रदीप नाटकांची तिकिटं ब्लॅकमध्ये विकायचे असं ते म्हणाले होते. हे ऐकल्यावर प्रदीप यांचा चेहरा फारच केविलवाणा झाला होता. विजय एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले की, प्रदीप निर्माते सुधीर भटांकडून काही तिकिटं घ्यायचा आणि ती नंतर ब्लॅकमध्ये विकायचा. नाटकाची नाईट नी त्यावर हे वरचे पैसे, कुठल्या नटाला हे सुचेल सांगा.’
हे ऐकल्यावर पटवर्धन यांनीही आपली बाजू सावरली होती. ‘मी कशाला तिकिटं ब्लॅक करीन, चांगली नोकरी करत होतो मी. माझ्या एण्ट्रीने मोरुची मावशी नाटक सुरू व्हायचं. तर मी तिथे एण्ट्री घेऊ की खालती तिकिटं ब्लॅकमध्ये विकत बसू,’ असं सांगत पाटकर खेचत असल्याचं सांगितलं.
प्रदीप पटवर्धन यांनी एक फुल चार हाफ (१९९१), डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट. पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला अशा अनेक सिनेमांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या