विजय मल्ल्याने ट्विटरवर होळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर नेटकऱ्यांच्या रडारवर, “आधी पैसे परत कर, मग…” सांगत मीम्सचा वर्षाव |Vijay Mallya Wishes Holi Netizens Target Him With Comments and Mems


भारतातून फरार कर्जबुडव्या विजय मल्ल्या कायम नेटकऱ्यांच्या रडारवर असतो. विजय मल्ल्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्याने काही ट्वीट किंवा पोस्ट केली की केली, लगेचच नेटकरी धारेवर धरतात.

भारतातून फरार कर्जबुडव्या विजय मल्ल्या कायम नेटकऱ्यांच्या रडारवर असतो. विजय मल्ल्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्याने काही ट्वीट किंवा पोस्ट केली की केली, लगेचच नेटकरी धारेवर धरतात. अनेकदा नेटकऱ्यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया देत सुनावलं आहे. त्यामुळे विजय मल्ल्याची पोस्ट त्या खालील कमेंट्स कायमच चर्चेत असतात. असंच एक ट्वीट चर्चेत आलं आहे. यावेळी निमित्त ठरलं ते होळी शुभेच्छांचं. कर्जबुडव्या विजय मल्ल्याने होळीच्या शुभेच्छा दिल्याने नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरलं आहे.

विजय मल्ल्याने गुरुवारी रात्री ट्वीट करत “Happy Holi to all” अशा शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर लगेचच या ट्वीटखाली कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला. अनेकांनी प्रतिक्रिया देत मल्ल्याची फिरकी घेत बुडवलेल्या पैशांबाबत विचारणा केली आहे.

एका युजर्सने लिहीले की, “आधी पैसे पत करत, मग शुभेच्छा दे”, तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, “आता रंग लावूनच भारतात परत ये”. यासह युजर्सने कमेंट बॉक्समध्ये मजेशीर मीम्स शेअर केले आहेत.

हेही वाचा :  त्या किंचाळत होता, ओरडत होत्या... भूल न देताच 24 महिलांवर झाली नसबंदी शस्त्रक्रिया

अलीकडेच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, विजय मल्ल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्तेतून बँकांनी १८ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. ईडीने पीएमएलए अंतर्गत न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार बँक डिफॉल्ट प्रकरणात ही रक्कम जप्त केली. या फरार व्यावसायिकांकडून घोटाळ्याची संपूर्ण रक्कम लवकरात लवकर वसूल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …