पुणे : महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर


भोसरीमधील गिरीजा लांडगे यांनी खुशी विनोद कांबोज आणि अरमान मुजावर यांच्या साथीने मोरोशीचा भैरवगड अवघ्या १२ तासात सर केला आहे. भैरवगडची उंची ४५० फूट आहे. अत्यंत कठीण आणि मातीचा काही भाग असलेल्या भैरवगडावर चढाई करण्याचा पराक्रम या तिघींनी जागतिक महिला दिनाच औचित्य साधून केला आहे. 

भैरवगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. चढाईसाठी अत्यंत कठीण आणि तांत्रिक माहिती असणाऱ्या गिर्यारोहकाला यावर चढाई करणे सोपे जाते. भोसरीमधील गिरीजा धनाजी लांडगे, कोल्हापूरच्या खुशी विनोद कांबोज आणि तासगावच्या अरमान मुजावर यांनी हा भैरवगड सर करायचा असा चंग बांधला होता. चार ही बाजूंनी सोसाट्याचा वारा वाहत असताना रुट क्लायंब करणं अवघड असते आणि वेळ ही खूप लागतो. त्यामुळे अनेक गिर्यारोहक ही मोहीम अर्ध्यावर सोडतात आहे. मात्र या तिघींनी एकत्र येत ही मोहिम सर केली आहे. 

कशी केली चढाई? 

महिलादिनाचे औचित्य साधून ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सह्याद्रीतील भैरवाचे म्हणजे भैरवगडाचे पूजन करुन गिर्यारोहणास सुरुवात केली. पहिल्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४:३० पर्यंत तिघींनी तिसऱ्या स्टेशन पर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे पहिल्या व दुसऱ्या स्टेशन पर्यंत शिडीचा वापर न करता प्रस्तरारोहण केले जे विशेष कौतुक करण्यासारखे आहे. तिसऱ्या स्टेशन पर्यंत पोहचण्यासाठी मध्ये असणारा ओव्हरहॅंग खूपच अवघड दमछाक करवणारा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच महिला सकाळी ११च्या सुमारास तिसऱ्या स्टेशनपासून पुढील चढाईला सुरुवात झाली. तिसऱ्या स्टेशन पासून ट्रॅव्हर्स मारत ओपन बुक सेल्फ आणि त्यानंतरची क्रॅक पार करत या तिनही मुली ध्येयापर्यंत पोहचल्या. पण, अधिकचा टप्पा पार करायचा होता. भिंतीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी कोणताही बोल्ट न वापरता ७० अंश कोनात १०० ते १२५  फुट स्क्री (मातीची निसरडी घसरण) अशी चढाई होती. ती चढून या तिघी भैरवगडाच्या माथ्यावर पोहचत मोहीम यशस्वी फत्ते केली. 

हेही वाचा :  Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

The post पुणे : महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या …

RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्राचे शेअर्स गडगडले; घ्यावेत का? एक्सपर्ट काय म्हणतात?

Kotak Bank Share Price: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. …