त्या किंचाळत होता, ओरडत होत्या… भूल न देताच 24 महिलांवर झाली नसबंदी शस्त्रक्रिया

Sterilized Surgery in Bihar : महिलांच्या नसबंदी शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांचे हाथ-पाय पकडून त्यांना जमिनीवर झोपवण्यात आलं आणि भूल (Anaesthesia) न देताच शस्त्रक्रिया (Operation) पूर्ण करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान महिला किंचाळत होता, ओरडत होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (Global Development Initiativ) नावाच्या खासगी एजन्सीने या महिलांचे ऑपरेशन केल्याचं सांगितलं जात आहे.

कुटुंब नियोजन शिबिरातील धक्कादायक प्रकार
बिहारमध्ये (Bihar) ही धक्कादायक घटना घडली आहे. इथं आरोग्य सुविधांची स्थिती किती बिकट आहे, याचं भीषण उदाहरण बिहारमधल्या खगरियामध्ये (Khagaria) दिसून आलं. खगरिया जिल्ह्यातील अलौली सामुदायिक स्वास्थ केंद्रात कुटुंब नियोजन शिबिर (Family Planning Camp) आयोजित करण्यात आलं होतं. या काही महिला नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी आल्या होत्या. पण या महिलांची भूल न देताच जबरदस्तीने शस्त्रक्रिया करण्यात आली. 

भूल न देताच शस्त्रक्रिया
शस्त्रक्रिया करण्याआधी भूल दिली जाते. पण या शिबिरात असा कोणतीही उपाययोजना नव्हती. शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिलांना भूल न देता त्यांचे हात पाय पकडून त्यांना जमिनीवर झोपवलं जात होतं. आणि त्याच अवस्थेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात होती. या महिन्यांच्या सुरुवातीच परबत्ता प्राथमिक आरोग्य केंद्रावरही असाच निष्काळजीपणा समोर आला होता.

हेही वाचा :  भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत 'मृत्यूच्या खेळाची' परंपरा

हे ही वाचा : मुंबईत गोवरचा आजार बळावला, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात धर्मगुरुंचीही मदत घ्या…

महिला किंचाळ होत्या, ओरडत होत्या
शस्त्रक्रिया सुरु असताना महिला किंचाळत होत्या, याविषयी बाहेर असणाऱ्या काही महिलांनी चौकशी केली तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. काही महिलांनी शस्त्रक्रिया करण्याआधी भूल देत नाही का असं प्रश्न विचारला असता त्यांना शस्त्रक्रियेनंतर भूलचं इंजेक्शन देण्यात येईल असं सांगण्यात आलं. हे प्रकरण धक्कादायक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. इन्फेक्शन आणि जखमेमुळे महिलांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

हे प्रकरण उघड झाल्यानंतर बिहारच्या आरोग्य विभागाने जबाबदारी ने घेता स्वयंसेवी संस्थेकडे बोट दाखवलं आगे. सिविल सर्जन डॉक्टर अमरनाथ झा यांनी अलौली प्रकरणाचा तपास होईल आणि अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …