VIDEO : पाकिस्तानात राशिद खानला का मिळाला गार्ड ऑफ ऑनर? आफ्रिदीनं मारली मिठी!


अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिन गोलंदाज राशिद खान याने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान संघाला मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी बांगलादेश (अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश) दौरा करावा लागणार आहे. राष्ट्रीय संघात आपली सेवा देण्यासाठी राशिदने हा निर्णय घेतला आहे.

राशिद पीएसएलच्या चालू हंगामात लाहोर कलंदर संघाकडून खेळत होता. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिका २३ फेब्रुवारीपासून चितगाव येथे होणार आहे. राशिदने सत्रातील शेवटचा सामना शनिवारी इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध खेळला. या सामन्यात राशिदने ४ षटकात १९ धावा देत २ बळी घेतले.

हेही वाचा – VIDEO : यश धुलचा डबल धमाका; लागोपाठ शतकांसह विश्वविजेत्या कॅप्टननं नोंदवला नवा विक्रम!

हेही वाचा :  ‘Badhaai Do’ गाण्यावर इवल्याश्या चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

सामन्यानंतर लाहोर कलंदरच्या खेळाडूंनी राशिद खानला मैदानातून गार्ड ऑफ ऑनर देऊन निरोप दिला. राशिद मैदानातून बाहेर पडत होता, त्यावेळी कलंदर संघाच्या खेळाडूंनी दोन्ही बाजूंनी हात वर केले आणि आपल्या स्टार गोलंदाजाला गार्ड ऑफ ऑनर दिला. राशिदला टाळ्यांच्या कडकडाटात मैदानातून निरोप देण्यात आला. यावेळी राशिद भावूक झाला. या स्पर्धेत पुन्हा एकदा राशिदने आपल्या फिरकीची जादू दाखवली. पीएसएल २०२२च्या ९ सामन्यात त्याने एकूण १३ विकेट घेतल्या. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने राशिदला मिठी मारून निरोप दिला.

The post VIDEO : पाकिस्तानात राशिद खानला का मिळाला गार्ड ऑफ ऑनर? आफ्रिदीनं मारली मिठी! appeared first on Loksatta.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …