Video : ‘हिंदी बोलता येतं का?’ प्रश्नावर सामंथाच्या उत्तराने जिंकली सर्वांची मनं, पाहा व्हिडीओ | samantha ruth prabhu answer to paparazzi question if she knows hindi


सामंथा रुथ प्रभूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे. आपल्या चित्रपटांपेक्षा सामंथा मागच्या काही काळापासून सातत्यानं तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तीच ती मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स तिला, ‘हिंदी बोलता येते का?’ असं विचारताना दिसत आहेत. पण यावर सामंथानं त्यांना जे उत्तर दिलं त्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सामंथा एअरपोर्टवरून बाहेर पडताना दिसत आहे. तिनं करोनापासून बचाव करण्यासाठी मास्कही लावला होता. यावेळी ती तिथे असलेल्या फोटोग्राफर्ससोबत खूपच आपुलकीनं वागताना दिसली. एका फोटोग्राफरनं सामंथाला यावेळी तुला हिंदी बोलता येतं का असा प्रश्न विचारला. त्यावर सामंथानं ‘थोडं- थोडं’ असं हिंदीतून उत्तर देत सर्वांची मनं जिंकली. सामंथाचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आणखी वाचा- फरहान अख्तरशी का केलं लग्न? शिबानी दांडेकरनं सांगितलं खरं कारण

सामंथाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच ती एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे काही दाक्षिणात्य चित्रपट आहे. तसेच ती अलिकडच्या काळात मुंबईत दिसत असल्यानं लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान काही काळापूर्वीच ती ‘पुष्पा’ चित्रपटाच्या आयटम नंबरमध्ये दिसली होती. जे प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं.

हेही वाचा :  समंथाप्रमाणेच यशोदामधील 'ही' अभिनेत्री करतेय मायोसिटिस आजाराचा सामना; दिली माहिती



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …