समंथाप्रमाणेच यशोदामधील ‘ही’ अभिनेत्री करतेय मायोसिटिस आजाराचा सामना; दिली माहिती

Samantha Ruth Prabhu: ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री समंथा (Samantha Ruth Prabhu) ही मायोसिटिस या आजाराचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे समंथानं या आजाराबद्दल माहिती दिली होती. सध्या समंथा ही तिच्या यशोदा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं जवळपास 20 कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली. आता समंथाप्रमाणेच यशोदा (Yashoda) या चित्रपटातील एक अभिनेत्री देखील मायोसिटिस या आजाराचा सामना करत आहे. या अभिनेत्रीचं नाव कल्पिका गणेश (Kalpika Ganesh) असं आहे. कल्पिकानं एका मुलाखती दरम्यान याबाबत माहिती दिली. 

एका कार्यक्रमात कल्पिकाने सांगितले की ती देखील मायोसिटिस आजाराचा सामना करत आहे. त्यानंतर कल्पिकाने माहिती दिली की, समंथा या आजाराच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. कल्पिकान सांगितले की, ती 13 वर्षांपासून मायोसिटिस आजाराचा सामना करत आहे. 

समंथाने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना सांगितलं की ती मायोसिटिस नावाच्या आजाराशी लढत आहे. यातून बरं होण्यासाठी आपल्याला थोडा अधिक वेळ लागत आहे, असंही तिनं पोस्टमध्ये सांगितलं. 


चित्रपटात समंथानं एका सरोगेटमदरची भूमिका साकारली आहे जी वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरु असलेला घोटाळा उघडकीस आणते. या चित्रपटात समंथा आणि कल्पिका गणेशसोबतच वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, दिव्या श्रीपदा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

हेही वाचा :  'ग्लोबल आडगाव' या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकाता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स

यशोदाला मिळाली प्रेक्षकांची पसंती 

देशभरातीलच नाही तर परदेशातील सिनेमागृहात देखील यशोदा या चित्रपटानं धुमाकूळ घातला. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. भारतामध्ये यशोदा चित्रपटानं 14 नोव्हेंबरला 1.35- 1.45 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटानं भारतामध्ये 12 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.  अमेरिकेमध्ये या चित्रपटानं 445K डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Yashoda Box Office Collection Day 4: देशातच नाही तर परदेशातही समंथाची हवा; ‘यशोदा’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?

 

 

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …