थिएटर आणि ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका

Friday OTT and Theatre Releases: आज (11 नोव्हेंबर) काही चित्रपट आणि वेब सीरिज या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत तर काही चित्रपट हे मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेत्री समांथा रुथ प्रभुचा (Samantha) ‘यशोदा’ (Yashoda) हा चित्रपट आणि अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ऊंचाई (Uunchai) हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. तसेच मार्व्हल युनिवर्सचा ब्लॅक पँथर: वकांडा फोरेवर हा चित्रपट देखील आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. जाणून घेऊयात आज ओटीटी आणि थिएटरमध्ये रिलीज होणारे चित्रपट तसेच ओटीटीवर रिलीज होणाऱ्या काही वेब सीरिज…

‘यशोदा’

समांथा रुथ प्रभुचा ‘यशोदा’ हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात समंथा बरोबरच  वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पना गणेश, दिव्या श्रीपदा, प्रियांका शर्मा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

Reels

ऊंचाई

ऊंचाई या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी आणि डॅनी डेंगजोप्मा यांनी ऊंचाई या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कलाकारांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

हेही वाचा :  तुझ्यामुळे शिकले प्रेम करायला... लग्नानंतर अथिया शेट्टीची इन्स्टा पोस्ट व्हायरल, पाहा खास PHOTO

ब्लॅक पँथर: वकांडा फोरेवर

मार्व्हल युनिवर्सच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आज ‘ब्लॅक पँथर’चा सिक्वेल ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ रिलीज झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

‘मोनिका ओ माय डार्लिंग’

राजकुमार, हुमा कुरेशी आणि राधिका आपटे स्टारर ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. हा क्राईम कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आकांक्षा रंजन कपूर, सिकंदर खेर आणि सुकांत गोयल या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वसंत बाला यांनी केले आहे.

मुखबिर

मुखबिर ही एक स्पाय थ्रिलर वेब सीरिज आहे. ही सीरिज Zee5 वर प्रदर्शित होत आहे.  यात झैन खान दुर्रानी, ​​प्रकाश राज, आदिल हुसैन, झोया अफरोज आणि बरखा बिश्त सारखे स्टार्स दिसणार आहेत.

‘थाय मसाज’

‘थाय मसाज’ ही एक कॉमेडी वेब सिरीज आहे. गजराजशिवाय दिव्येंदू शर्मा, सनी हिंदुजा, राजपाल यादव, विभा छिब्बर यांसारखे कालाकारांनी या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Shehnaaz Gill: ‘हा चित्रपट पाहून मी रडले’; ‘ऊंचाई’ चित्रपट पाहिल्यानंतर शहनाज गिलनं व्यक्त केल्या भावना

हेही वाचा :  Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ' सिनेमातील पंकज त्रिपाठींचा लूक आऊट

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …