‘वेडात मराठे…’मध्ये वीर म्हणून झळकणार सत्या महेश मांजरेकर, कितवी शिकलाय जाणून घ्या

Satya Manjrekar Education Details: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सात मावळ्यांच्या पराक्रमावर आधारित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedant Marathe Veer Daudale Saat) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवरायांच्या सात वीरांमध्ये अभिनेता प्रवीण तरडे मावळे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता हार्दिक जोशी मल्हारी लोखंडेंच्या भूमिकेत आहे. ‘बिग बॉस मराठी ३’ फेम विशाल निकम, जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे हे देखील या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये आहेत. दरम्यान या सर्वांमध्ये सत्या मांजरेकर याची चर्चा होते. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर (Satya Manjrekar) याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या शिक्षण आणि करिअरविषयी जाणून घेऊया.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिका साकारताना दिसणार आहे. सोबतच महाराजांच्या सात मावळ्यांच्या रूपात मराठी चित्रपटसृष्टीमधील निरनिराळे कलाकार दिसणार आहेत. मात्र या सात अभिनेत्यांमध्ये लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचा मुलगा असल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर त्याच्या शिक्षण, करिअरविषयी चर्चा केली जात आहे.

हेही वाचा :  महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती

सत्या मांजरेकर गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात आहे. तो प्रामुख्याने बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करतो. १९९५ मध्ये त्यांने बालकलाकार म्हणून आई हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर तो वाह लाइफ हो तो ऐसी (२००५) सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसला. आपण त्याला जानिवामध्ये पाहू शकता आणि हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर तो FU: फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला.

Prajakta Mali Education: तरुणांची क्रश प्राजक्ता माळी कोणत्या शाळा-कॉलेजमध्ये शिकली माहितेय का?
सत्या मांजरेकरचा जन्म १९ मार्च रोजी मुंबईत झाला. अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा म्हणून तो परिचित आहे. सत्याचे शालेय शिक्षण मुंबईच्या त्रिधा स्कूलमध्ये झाले. त्यानंतर मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजमधून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

सत्याने १९९५ मध्ये आई चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ग्रॅज्युएशननंतर, तो २००५ मध्ये वाह लाइफ हो तो ऐसी, २०१४ मध्ये पोर बाजार आणि २०१५ मध्ये जानिवा यासारख्या विविध चित्रपटांमध्ये दिसला. महेश माजरेकर दिग्दर्शित एफयू : फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटात त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. यावेळी आकाश ठोसर आणि संस्कृती बालगुडे यांनी त्याच्यासोबत काम केले.

हेही वाचा :  भारतात ८३ हजार जागांसाठी १६ लाख अर्ज, विद्यार्थ्यांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळविण्याचे दडपण

Hruta Durgule Education Details: तरुणांची क्रश हृता दुर्गुळेचं शिक्षण तुम्हाला माहितेय का?

Ajit Pawar Education: भल्याभल्या राजकारण्यांची ‘शाळा’ घेणारे अजित पवार कितवी शिकले माहितेय का?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …