Valentine Week 2023: ‘व्हॅलेंटाईन वीक’ची सुरूवात कधी झाली? वाचा रंजक कहाणी!

Happy Valentine Day 2023: प्रेम म्हणजे प्रेम (Love) असतं, तुमचं आमचं सेम असतं… प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा आठवडा (Valentine Week) म्हणजे ‘व्हॅलेंटाईन वीक’. अनेक प्रेमीयुगुल या आठवड्याची वाट पाहत असतात. कोणत्याही स्वार्थाविना केलेलं प्रेम हा व्हॅलेंटाइनचा खरा अर्थ. मात्र, अनेकजण याचा वेगळा अर्थ घेतात. त्यामुळे अनेक धक्कादायक बातम्या देखील ऐकायला मिळतात. मात्र, प्रेमाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom of expression to love) देणाऱ्या दिवसाचं महत्त्व काय आणि ‘व्हॅलेंटाईन वीक’ची सुरूवात कधी झाली? याची माहिती घेणं देखील गरजेचं आहे. (Valentine Week 2023 When did Valentine Week start Read the story behind it marathi news)

‘व्हॅलेंटाईन डे’ची सुरुवात कशी झाली? (How did Valentine’s Day get started?)

व्हॅलेंटाईन डे हे मूळ संत व्हॅलेंटाईनच्या (Saint Valentine) नावावरून आहे असे मानले जाते, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या संत व्हॅलेंटाईनबद्दल विविध मतं आहेत आणि कोणतीही अचूक माहिती नाही. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. संत व्हॅलेंटाईनने मृत्यूवेळी जेलरची अंधमुलगी जेकोबस (jacobs) हिला आपले डोळे दान केले होते आणि जेकोबसला एक पत्र लिहिलं होतं, ज्याच्या शेवटी त्यानं ‘युवर व्हॅलेंटाईन’ असं लिहिलं होतं. तो दिवस होता 14 फेब्रुवारी… हा दिवस नंतर व्हॅलेंटाईनच्या नावाने साजरा केला जातो आणि व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने निस्वार्थ प्रेमाचा संदेश जगभर पसरला.

हेही वाचा :  मराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्...; 15 महत्त्वाचे मुद्दे

प्रेम करण्यावर बंदी घालणाऱ्या रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाविरुद्ध व्हॅलेंटाइनने बंड केलं. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचे जेलरच्या मुलीवर प्रेम बसलं. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून इसवी सन 269 च्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिलं होतं. ज्यात ‘युवर व्हॅलेंटाईन’ असा (Your Valentine) शब्दप्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर ही कहाणी जगभर पसरली.

Valentine Week Love Horoscope : व्हॅलेंटाईन वीकमध्ये तूळ आणि धनु राशीसह ‘या’ 5 राशीत असणार प्रेमच प्रेम

जाणून घ्या वेळापत्रक (Valentine Week Time Table) –

7 फेब्रुवारी, रोज डे (Rose Day) 
8 फेब्रुवारी, प्रपोज डे (Propose day) 
9 फेब्रुवारी, चॉकलेट डे (Chocolate Day)
10 फेब्रुवारी, टेडी डे (Teddy Day)
11 फेब्रुवारी, प्रॉमिस डे (Promise Day)
12 फेब्रुवारी, हग डे (Hug Day)
13 फेब्रुवारी, किस डे (Kiss Day)
14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)

दरम्यान, प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या (Definition of love) वेगळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या देशात प्रेमाची विविध पद्धतीने दिवस साजरा केला जातो. नकार असला तरी पचवण्याची तयारी ठेवून प्रेम व्यक्त करणं गरजेचं आहे. मंगेश पाडगावकर म्हणतात, पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही…आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?

हेही वाचा :  बुरखा घालून मॉलमध्ये घुसला इंजिनिअर तरुण; महिलांच्या वॉशरूममध्ये व्हिडीओ शूट करताना अटक



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …