Vaginal Odor: गरोदरपणात योनिमार्गातून दुर्गंधी येणं नॉर्मल आहे का, काय म्हणतात तज्ज्ञ

गरोदरपणात योनिमार्गातून दुर्गंध येणे सामान्य आहे का?

डॉ. श्वेताच्या म्हणण्याप्रमाणे गरोदरपणाच्या दरम्यान महिलांच्या योनीमधून स्राव येत असतो. बरेचदा महिलांना योनीची स्वच्छता न झाल्याने अथवा शरीरातील विटामिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे हे घडते असे वाटते. पण ही अत्यंत सामान्य प्रक्रिया आहे. हा जो स्राव येतो, त्याच्यामुळे प्रेगन्सीमध्ये योनिमार्गातून दुर्गंध येणे हे अत्यंत कॉमन आहे. साधारणतः ६० ते ६५ टक्के महिलांना गरोदरणाच्या सुरूवातीच्या दिवसात दुर्गंधीयुक्त स्राव येत असतो. यामध्ये घाबरण्याची काहीच गरज नाही.

गरोदरपणात योनिमार्गातून का येतो दुर्गंध?

What Causes Vaginal Odor During Pregnancy: गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यापासून ते पाचव्या महिन्यादरम्यान योनितून दुर्गंध येण्याची अनेक कारणे असू शकतात. काही वेळा योनीतून दुर्गंध येण्यासाठी घाम, संक्रमण अथवा सतत स्राव येणे हीदेखील कारणं असू शकतात. जाणून घेऊया महत्त्वाची कारणे –

  • इन्फेक्शन होणे
  • सतत घाम येणे
  • संक्रमण हे महत्त्वाचे कारण
  • हार्मोन्समधील बदल
  • पीएच संतुलन बदलणे
  • खाण्यापिण्याच्या सवयीत अधिक बदल होणे
हेही वाचा :  उर्फी जावेदला देतेय ही गायिका टक्कर, बिग बॉसची माजी स्पर्धक दिसतेय सतत बिकिनी लुकमध्ये

(वाचा – योनिमार्गातील कोरडेपणा कसा दूर कराल? कशी घेता येईल काळजी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन)

योनीच्या दुर्गंधीपासून गरोदरपणात कशी मिळवाल सुटका

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे योनीमधून दुर्गंध येणे ही सामान्य बाबत आहे. तरीही अशी दुर्गंधी सहन होत नाही. पण यासाठी काही विशिष्ट औषधाचीही गरज भासत नाही. मुलांच्या जन्मानंतर महिलांच्या योनिमार्गातील ही दुर्गंंधी स्वतःहून निघून जाते. तरीही काही सोपे उपाय करून तुम्ही ही दुर्गंधी कमी करू शकता.

  • नियमित सुती अथवा कॉटनचे कपडे परिधान करणे
  • योनी नेहमी स्वच्छ ठेवावी
  • योनीच्या भागावर घाम येऊ न देणे
  • योनिमार्गात कोणत्याही प्रकारचे कॉस्मेटिक वा रसायन वापरू नये
  • शरीर नियमित हायड्रेट ठेवावे
  • जास्त टाईट कपड्यांचा वापर करू नये

(वाचा – विविध आजारांवर प्रभावी ठरतेय स्टेम सेल थेरपी, कर्करोगासाठीही ठरतेय फायदेशीर)

डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा

पहिल्यांदाच गरोदर असाल आणि अशी योनी दुर्गंधीची समस्या असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. त्वरीत डॉक्टरांना दाखवायला हवं असंही नाही. मात्र तुम्हाला यादरम्यान योनीमार्गात दुर्गंधीसह अधिक खाज येत असेल अथवा जळजळ होत असेल तर मात्र तुम्ही त्वरीत डॉक्टरांकडे जावे.

  • अधिक लालसर झाल्यास
  • सतत खाज येत असल्यास
  • सतत जळजळ जाणवत असल्यास
  • लघ्वीला जाताना जळजळ झाल्यास
  • वेगळ्या रंगाचा डिस्चार्ज झाल्यास
हेही वाचा :  प्रेग्नंसीमध्ये केस धुणे योग्य आहे का ? डॉक्टरांकडून जाणून घ्या उत्तर

प्रश्नोत्तरे

१. गरोदरपणात दुर्गंधी आल्यामुळे बाळंतपणात त्रास होत नाही ना?

नाही अजिबात नाही. योनिमार्गातील दुर्गंधीचा बाळाला त्रास होत नाही.

२. योनिमार्गातील दुर्गंधी किती काळ राहाते?

साधारण दोन ते पाच महिने. तर काही महिलांना पूर्ण गरोदरपणात त्रास होतो. मात्र बाळाच्या जन्मानंतर ही दुर्गंधी नाहिशी होते.

३. कोणत्या विशिष्ट प्रकारची अंडरवेअर वापरणे गरजेचे आहे का?

हो. तुम्ही गरोदरपणात कॉटनची अंडरवेअर घालावी. यामुळे दुर्गंधीचा त्रास कमी होण्याची शक्यता असते.

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …