Fashion tips: लग्न सराईत साडी नेसायचीये..टॉपला बनवा ब्लाउज…मॅचिंग ब्लाउजची गरजच नाही

fashion tips: सणवार म्हटले कि आपल्याकडे साडी नेसणं आवर्जून येतच. पण बऱ्याचदा असं होत कि, आपल्याला साडी नेसायची असते पण ऐन वेळी ब्लाउज होत नाही किंवा ब्लाउज मॅच (maching blouse) होत नाही

सध्या सगळीकडे लग्नसराई (wedding season) सुरु आहे, लग्न समारंभ म्हटले कि, साडी नेसणं हे आलंच पण तुमच्यासोबत असं कधी झालाय का कि साडी नेसायला काढली आणि ऐनवेळी ब्लाउज फिटिंग होत नाही किंवा सैल होतो आणि मग आपली पंचाईत  होऊन जाते. आणि मग आपला हिरमोड होऊन जातो. 

पण आता यावर एक सोल्युशन सापडलं आहे. ( fashion this wedding season make ur top as blouse and wear saree and look beautifull )

हे काही ऑप्शन आहेत ज्यात तुमच्याकडे ब्लाउज नसेल तरी तुम्ही साडी नेसू शकता आणि या फेस्टिवल सिजनमध्ये सर्वात उठून दिसू शकता.  

ब्लॅक क्रॉप टॉप (black crop top)

फ्लोरल प्रिंटची साडी असो किंवा सिल्कची साडी, ती ब्लॅक क्रॉप टॉपवर सहज मॅच करता येते. क्रॉप टॉप साड्यांसोबत सहज मॅच होतात. . फक्त मॅचिंग  दागिने आणि परफेक्ट मेकअप  करायला विसरू नका.  ब्लॅक क्रॉप टॉप कोणत्याही साडी किंवा लेहेंग्यासोबत मॅच करता येतो.

हेही वाचा :  जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या; आठवडाभर सुरु होती हत्येची मालिका

रफल टॉप (ruffle top)

साडीसोबत मॅचिंग ब्लाउज नसल्यास रफल टॉपसह फ्युजन लूकमध्ये साडी नेसू  शकता. कोणत्याही रफल डिझाइन टॉपला साडीसोबत मॅच करा . हे खूप वेगळे दिसेल आणि स्टायलिश देखील दिसेल.

पफ स्लीव्ह टॉप (puff sleeves top)

पफ स्लीव्ह डिझाईन असलेले टॉप्सही साड्यांसोबत मॅच करता येतात. हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. जर तुमचे हात जाड किंवा पातळ असतील तर अशा प्रकारच्या स्लीव्ह डिझाइनमुळे तुम्हाला सुंदर लुक मिळेल.

टॅंक टॉप (tank top)

कोणत्याही साडीला काळ्या रंगाच्या टँक टॉपसोबत मॅच करा. ते स्टायलिश दिसेल आणि तुम्हाला वेगळे बनवेल. विशेषत: काळ्या रंगाचे टँक टॉप्स साडीसोबत सहज मॅच करतात. त्यामुळे या दिवाळीत साडी नेसण्याचा बेत सोडण्याऐवजी यापैकी कोणत्याही टॉपशी साडी मॅच करा. तुम्हाला पूर्णपणे वेगळा लुक मिळेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …