Indian Railway Cancel Train List: रेल्वेने रद्द केल्या 276 गाड्या; घरातून बाहेर पडण्यापूर्वी ‘येथे’ पाहा कॅन्सल गाड्यांची यादी

Indian Railways Cancelled Train List: भारतीय रेल्वे (Indian Railway News) हा देशातील सामान्य लोकांच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. अशा परिस्थितीत रेल्वे देखील प्रवाशांच्या सोयीची पूर्ण काळजी घेते. देशात दररोज हजारो गाड्या धावतात. रेल्वे प्रशासनानं एखादी ट्रेन वळवली किंवा रद्द केली किंवा वेळापत्रक बदलले, तर अशा परिस्थितीत प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतं. दरम्यान 10 डिसेंबर 2022 रोजी देशभरातून सुटणाऱ्या 276 गाड्या आज रेल्वेने रद्द केल्या आहेत. या रद्द केलेल्या गाड्यांमध्ये (Train Cancelled Today) मोठ्या संख्येने प्रवासी, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

भारतीय रेल्वेकडून कधी कधी खराब हवामान हे गाड्या रद्द करण्यामागे कारण असते. पाऊस, वादळ आदींमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द केल्या जातात. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेमुळे अनेक वेळा गाड्या रद्द केल्या जातात किंवा त्यांच्या वेळा बदलल्या जातात. यासोबतच अनेकवेळा रेल्वे रुळांच्या दुरावस्थेमुळे ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो. याचपार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेकडून आज ( 10 december 2022) देशभरातून सुटणाऱ्या 276 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  

हेही वाचा :  'बायको माझ्या आवडीची साडी नाही नेसतं' पतीची पोलिसांत तक्रार; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

वाचाक्रिकेटमुळे भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील का? जाणून घ्या परराष्ट्र मंत्री काय म्हणाले  

अनेक कारणांमुळे गाड्या रद्द  

जर तुम्ही आयआरसीटीसी (Irctc Update) वरून किंवा रेल्वे काउंटरवरून तिकीट खरेदी केले असेल तर  भारतीय रेल्वे तुम्हाला तिकीटाते रिफंड मिळणार आहे. भारतीय रेल्वेने  (Indian Railway) देशभरातील रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये सुरू असलेल्या दुरुस्ती आणि इतर कारणांमुळे इतक्या गाड्या न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज इतक्या गाड्या रद्द झाल्यामुळे देशभरातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

रद्द केलेल्या ट्रेनची यादी कशी तपासायची

रेल्वेने 6 गाड्यांचे वेळापत्रकही बदलले असून 22 गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. तुम्ही तुमच्या ट्रेनची स्थिती देखील तपासू शकता. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट enquiry.indianrail.gov.in/mntes/ ला भेट द्या. येथे तुम्हाला उजव्या बाजूला अपवादात्मक गाड्यांचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. येथे तुम्ही रद्द केलेल्या ट्रेनची यादी तपासू शकता, ट्रेनचे वेळापत्रक बदलू शकता आणि ट्रेन वळवू शकता. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …