राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. राजू श्रीवास्तव यांचे मित्र, चाहते सगळेचजण त्यांच्या कुटुंबाला आधार देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचं सांगत आहेत. या मिळणाऱ्या प्रेमाबद्दल राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतराने सगळ्यांचे आभार मानले आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्यावर आज म्हणजेच गुरुवारी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांनी रडलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला. उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री सुनील पाल, मधुर भांडारकर हे देखील स्मशानभूमीत पोहोचले आहेत. लोक राजू श्रीवास्तव अमर रहेच्या घोषणा देत आहेत.
हेही वाचा – Raju srivastava Video: राजू श्रीवास्तव यांनी आधीच केला होता यमराजचा उल्लेख; मृत्यूनंतर ‘तो’ VIDEO VIRAL
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.20 वाजता निधन झाले. तब्बल 42 दिवस मृत्यूशी झुंज देणारे राजू श्रीवास्तव अखेर ही लढाई हरले. त्यांच्या जाण्यानं सगळीकडे शोककळा पसरली आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन झाले.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या