उर्फी जावेदचं सामान घेऊन ड्रायव्हरच पळाला, तासाभरानंतर परतला, पण…

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या ऑफबीट फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. सध्या उर्फी दिल्लीत असून तिथे तिला एक वाईट अनुभव आला आहे. उर्फीने दिल्लीत एक कॅब बुक केली होती. दरम्यान, ड्रायव्हर तिचे सामान घेऊन पळून गेला आहे. उर्फीने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

उर्फीने दिल्लीत सहा तासाच्या प्रवासासाठी उबेर कॅब बुक केली होती. दरम्यान, विमानतळावरच्या वाटेवर ती जेवणासाठी थांबली. तेव्हा ड्रायव्हर तिचं सामान घेऊन पळून गेला. त्यानंतर तिचा एक मित्र तिच्या मदतीला धावून आला. तिच्या मित्राने त्या उबेर ड्रायव्हरला सतत फोन केले. त्यानंतर तो ड्रायव्हर तासाभरानंतर उर्फीला भेटला, पण तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता. 

काहीतरी करा… महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे : उर्फी जावेद

उर्फी जावेदने इन्साग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. महिल्यांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करा… उबेरचा मला खूप वाईट अनुभव आला आहे. आधी माझं सामान घेऊन ड्रायव्हर पळून गेला आणि नंतर परतला तेव्हा, तो नशेत होता. महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे”. उर्फीच्या ट्वीटनंतर उबेर कंपनीने तिची माफी मागितली आहे.

उर्फीने उबेर अॅपवरील कॅब आणि ड्रायव्हरसंबंधी माहिती देणारा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने लिहिलं आहे, “उबेर कॅबचा मला खूप वाईट अनुभव आला आहे. दिल्लीत मी सहा तासांच्या प्रवासासाठी एक कॅब बुक केली होती. दरम्यान, मला भूक लागल्याने आम्ही विमानतळाजवळ एका ठिकाणी थांबलो होतो. त्यावेळी ड्रायव्हर माझं सामान घेऊन पळून गेला. त्यानंतर मला काही सुचत नव्हतं. त्यामुळे माझ्या एका मित्राने मला मदत केली. त्यानंतर तासाभरानंतर तो ड्रायव्हर परतला. पण तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता”. उर्फीचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

हेही वाचा :  OTT : प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार 'हे' सिनेमे

Urfi Javed : ‘व्हॅलेंटाईन डे’ला गाईला मिठी मारा; केंद्र सरकारच्या सल्ल्यावर उर्फी जावेद म्हणाली…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …