UGC NET Results 2022: यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर, येथे तपासा

UGC NET Results 2022: यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि ugcnet.nta.nic वर निकाल पाहता येणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी निकालासंदर्भात माहिती दिली होती.

या वर्षी ही परीक्षा चार टप्प्यात घेण्यात आली होती. पहिला टप्पा ९ जुलै ते १२ जुलै दरम्यान घेण्यात आला. दुसरा टप्पा २० सप्टेंबरला सुरू झाला आणि २३ सप्टेंबरला संपला. तिसरा टप्पा २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आला. त्याच वेळी, अंतिम टप्प्यातील परीक्षा ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली.

विविध टप्प्यात परीक्षा झाल्यानंतर तात्पुरती उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. तात्पुरत्या उत्तर-तालिकेवरील आक्षेप एकत्रित केल्यानंतर, तज्ञ पॅनेलने या हरकती निकाली काढल्या. याअंतर्गत उमेदवारांनी कोणत्याही प्रश्नाच्या परीक्षेवर आक्षेप घेतल्यास त्याची नोंदणी केल्यानंतर आता अंतिम उत्तरपत्रिका नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर आता निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Police Recruitment: शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम पुढे ढकलला

Bank of Baroda मध्ये काम करण्याची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

हेही वाचा :  TNPSC Recruitment 2023 – Opening for 09 Officer Posts | Apply Online

UGC NET Results 2022: असा पाहा निकाल

यूजीसी नेट निकाल २०२२ तपासण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सह लॉग इन करणे आवश्यक आहे. तर संबंधित अधिक तपशीलांसाठी, उमेदवार यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
SSC GD कॉन्स्टेबलची २४,३६९ पदे भरणार, जाणून घ्या सर्व महत्त्वाचा तपशील

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …