Shehnaaz Gill Birthday: शहनाझ गिलचा Fat To Fit प्रवास, वजन कमी करण्यासाठी केला या पदार्थांचा वापर

शहनाझ गिल हे नाव बिग बॉस १३ मुळे नावारूपाला आले आणि सिद्धार्थ शुक्लासह तिच्या मैत्रीमुळे ती अधिक नावारूपाला आली. लवकरच शहनाझ गिलचा सलमान खानसह ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट येत आहे. तर शहनाझचा आज वाढदिवस असून तिने तिचे वजन कसे कमी केले हे प्रत्येकाने जाणून घ्यायला हवे. तिचा हा वेट लॉसचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर शहनाजने ज्या पदार्थांचा वापर केला त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. एका मुलाखतीमध्ये शहनाझने आपल्या वेट लॉसविषयी सांगितले होते. (फोटो सौजन्य – Canva and @shehnaazgill Instagram)

​वजन कमी करण्यासाठी हळद आणि पाण्याचा उपयोग​

​वजन कमी करण्यासाठी हळद आणि पाण्याचा उपयोग​

Turmeric Benefits For Weight Loss: आपल्या डाएटमध्ये हळदीचा समावेश करून घ्या. हळद त्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त ठरते ज्यांना वेट लॉस करण्याची इच्छा आहे. हळदीमध्ये वोलेटाईल ऑईल, पोटॅशियम, ओमेगा – ३ फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबर जास्त प्रमाणात असते, जे पचनक्रियेसाठी उपयुक्त ठरते. तसंच अतिरिक्त चरबी घटविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात एक चमचा हळद मिक्स करून प्यायल्यास याचा फायदा मिळतो.

हेही वाचा :  Maharashtra Politics : 'शिंदेंना पदावरून काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही', राहुल नार्वेकर असं का म्हणाले?

​आलं आणि हळदीचे मिक्स्चर​

​आलं आणि हळदीचे मिक्स्चर​

पाण्यामध्ये थोडेसे आलं आणि हळद पावडर घालून उकळून घ्या. हे मिश्रण नंतर थंड होऊ द्या आणि थंड झाल्यावर हे मिश्रण प्या. वजन कमी करण्यासाठी याचा नक्कीच फायदा मिळतो.

(वाचा – Weight Loss: सोनाक्षी सिन्हाने असे केले होते ३० किलो वजन कमी, वेट लॉसची सोपी पद्धत)

​पुदिन्याची पाने​

​पुदिन्याची पाने​

तुम्हाला वजन कमी करताना थकवाही यायला नको असेल तर तुम्ही पुदिन्याची पाने घालून पाणी उकळून घ्या आणि यामध्ये हळदही मिक्स करा. हे हळदीचे पाणी केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर तुमची पचनक्रिया अधिक चांगली करण्यासाठीही उपयुक्त ठरते.

(वाचा – नीता अंंबानी यांनी असे केले होते १८ किलो वजन कमी, या २ पदार्थांच्या सेवनाने मिळाला होता फायदा)

​दालचिनी​

​दालचिनी​

दालचिनीच्या पावडरचा वजन कमी करण्यासाठी उपयोग केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. हळदीच्या दुधामध्ये तुम्ही दालचिनीचा लहान तुकडा अथवा दालचिनी पावडर मिक्स करा आणि हे उकळून घ्या. दालचिनीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट हे शरीरातील चरबी वितविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते.

(वाचा – वेट लॉसपासून स्मरणशक्ती वाढविण्यापर्यंत जिऱ्याच्या पावडरचे फायदे आहेत वाखाणण्याजोगे)

हेही वाचा :  शेवटची संधी, नाही तर आम्ही थेट कर्नाटकात जाऊ... जतमधील कृती समितीचा महाराष्ट्र सरकारला इशारा

​मधाचा वापर​

​मधाचा वापर​

तुम्ही सकाळी उठल्यानंतर थोडीशी कच्ची हळद घ्या आणि त्यात एक चमचा मध मिक्स करून खा. तुम्हाला हवं असल्यास, गरम दुधातही हे मिक्स करू शकता. यामुळे अतिरिक्त चरबी जळण्यास मदत मिळते.

वर सांगितलेले उपाय हे आयुर्वेदातही सांगण्यात आले आहेत. शहनाझ गिलनेही व्यायामासह या उपायांचा वापर केला असं मुलाखतीमध्ये सांगितले होते. वरील उपाय हे माहितीसाठी देण्यात आले आहेत. याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नक्की सल्लामसलत करावी.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …