पठाणचं ‘या’ बॉलिवूड कलाकारांकडून तोंडभरुन कौतुक

Pathan: अभिनेता  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathan) 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी पठाण या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. रवीना टंडन (Raveena Tandon), हृतिक रोशन (Hrithik Roshan),  विकी कौशल (Vicky Kaushal), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं आहे. 

रवीना टंडन (Raveena Tandon)

अभिनेत्री रवीना टंडननं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन लिहिलं, ‘पठाण,  OMG! विलक्षण! शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, हे फॅनटॅस्टिक आहेत.’ 

हृतिक रोशन (Hrithik Roshan)

‘What a trip. पूर्वी कधीही न पाहिलेले व्हिज्युअल, चांगली पटकथा, अप्रतिम संगीत, आश्चर्य ट्विस्ट. सिड तू पुन्हा हे करुन दाखवलंस, आधी तुझे धैर्य पाहून मी थक्क होतो. शाहरुख, दीपिका, जॉन आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन.’ असं ट्वीट हृतिकनं शेअर करुन पठाणच्या टीमचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा :  ना लग्न ना निकाह, ‘या’ खास पद्धतीने फरहान-शिबानी बांधणार साताजन्माची गाठ!

विकी कौशल (Vicky Kaushal)

 

विकी कौशलनं सोशल मीडियावर शाहरुखचा फोटो शेअर करुन लिहिले, ‘एखाद्या चित्रपटाचा भाग होण्याचं स्वप्न पुन्हा पाहण्यासाठी  तू पुन्हा आम्हाला प्रेरित करत आहेस. थँक्यू’  

 

अर्जुन कपूर (Arjun Kapoor)

 

अर्जुन कपूरनं पठाणचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन लिहिलं, ‘पठाण हा चित्रपट नाही तर एक भावना आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन’

 

पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली. शाहरुखनं या चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे.

हेही वाचा :  27 मार्चला साजरा होणाऱ्या जागतिक रंगभूमीविषयी थोडक्यात...

 

महत्वाच्या इतर बातम्या:



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …