Uber ने जास्त पैसे घेतले, प्रवाशाने कस्टमर केअरला फोन लावला… पण पुढे जे झालं ते भयानक होतं

Uber customer care scam : इंटरनेटच्या युगात सायबर गुन्हेगारी मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. दररोज फसवणुकीचे हजारो गुन्हे दाखल होत आहेत.  सायबर गुन्हेगार  (Cyber Crime) फसवणूकीचे नवनवे फंडे शोधून काढत असून सामान्य लोकांना लाखो रुपयांचा चूना लावला जात आहे. आता असाच फसवणूकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतल्या एका उबर कस्टमर केअर स्कॅमला  (Uber customer care scam) सामोरं जावं लागलंय. या व्यक्तीने गुगलवर देण्यात आलेल्या बोगस सेवा क्रमांकावर फोन करत उबेर प्रवासासाठी मदत मागितली. या व्यक्तीने उबेरचं अधिकृत अॅप वापरण्याऐवजी गुगलवर Uber सर्च केलं. 

काय आहे नेमकी घटना?
दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतल्या एसजे एन्क्लेव्हमध्ये राहाणाऱ्या प्रदीप चौधरी यांनी गुरुग्रामला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बूक केली. टॅक्सी बुकिंग करताना त्या व्यक्तीला प्रवासभाडं 205 रुपये दाखवण्यात आलं. प्रदीप चौधरी यांनी उबेर टॅक्सी बूक केली, ठरलेल्या वेळेनुसार टॅक्सी आली. पण जेव्हा प्रदीप चौधरी गुरुग्राममध्ये पोहोचले तेव्हा प्रवास भाडं 318 रुपये सांगण्यात आलं. मदतीसाठी प्रदीप चौधरी यांनी गुगरवर जो हेल्पलाईन नंबर दखवण्यात आला, त्या नंबरवर संपर्क साधला.

हेही वाचा :  Gmail वर येणाऱ्या Yellow Arrow चा काय अर्थ?, जाणून घ्या काय होतो फायदा

गुगलवरुन सर्च केला नंबर
विशेष म्हणजे उबेर टॅक्सीच्या ड्रायव्हरने प्रदीप चौधरी यांना कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. पण प्रदीप चौधरी यांनी अधिकृत अॅप निवडण्याऐवजी गुगलवरुन उबर हेल्पलाईन नंबर सर्च केला. गुगलवर त्यांना ‘6289339056’ नंबर सापडला. प्रदीप चौधरी यांनी या नंबर वर कॉल केला, तो कॉल राकेश मिश्रा नावाच्या मोबाईलवर  ‘9832459993’ रिकनेक्ट करण्यात आला. 

अशी केली फसवणूक
राकेश मिश्रा नावाच्या व्यक्तीने प्रदीप चौधरी यांनी गुगस प्ले स्टोरवुन रस्ट डेस्क अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं. या अॅपमधून मिश्रााने चौधरी यांना एक फेक रिफंड मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये 112 रुपये रिफंड करण्यात यते आहेत, असं लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर चौधरी यांनी आपला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट नंबर आणि चार नंबरचा ओटीपी  दिलेल्या लिंकवर पाठवला. राकेश मिश्राने प्रदीप चौधरी यांना थोड्याचवेळात तुमच्या अकाऊंटमध्ये रिफंडचे पेसे येतील असं उत्तर दिलं आणि फोन बंद केला. 

बँक खात्यातून उडाले पैसे
अवघ्या काही सेकंदात प्रदीप चौधरी यांना पहिला मेसेज आला. त्यांच्या बँक अकाऊंटमधून 83,760 रुपये काढण्यात आले होते. त्यानतंर  4 लाख रुपये, 20,012 रुपये असे एकामागोमाग एक ट्रान्सेक्शन झाली. एकूण पाच लाख रुपये प्रदीप चौधरी यांच्या अकाऊंटमधून काढण्यात आले होते. यातले तीन ट्रान्सेक्शन पेटीएममधून तर एक PNBC बँकेतून करण्यात आलं होतं. आपण फसवलो गेल्याचं लक्षात येताच प्रदीप चौधरी यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत फसवणूकीची तक्रार दाखल केली. 

हेही वाचा :  टायर बनवणाऱ्या कंपनीने स्विकारली टूथ ब्रश टेक्नॉलॉजी, खराब झाल्यावर बदलणार पहिला रंग



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …