Google वर IRCTC चा कस्टमर केअर नंबर सर्च करणे पडले भारी, 5 लाख रुपये खात्यातून गायब

Cyber Crime News : इंटरनेटवर काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हाला चांगलाच भुर्दंड पडू शकतो. कारण  सायबर फ्रॉडच्या घटनांत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे गूगलवर बँक किंवा कोणत्याही कंपनीशी संबंधित ‘कस्टमर केअर’चा सर्च करणे टाळले पाहिजे. कारण गूगलच्या सर्च इंजिनमध्ये वरच्या लिंकवर दिसणारे नंबर सायबर ठगांचेही असू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. IRCTC चा कस्टमर केअर नंबर शोधणे एकाला महागात पडले आहे. काही मिनिटात त्यांच्या खात्यातून 5 लाख रुपये गायब झालेत.

सायबर घोटाळेबाज नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. त्यामुळे इंटरनेटवर काहीही शोधण्यापूर्वी सावध राहण्याची गरज आहे. विशेषत: जेव्हा तुम्हाला गूगलवर कस्टमर केअर नंबर किंवा हेल्पलाइन नंबरशी संबंधित माहिती शोधायची असेल, तेव्हा विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नोएडातील एक तरुणी अशा फसवणुकीची बळी ठरली आहे. ज्यामुळे तिच्या खात्यातून 10 मिनिटांत 5 लाख रुपये काढले गेले, तर 3 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्जही पाच मिनिटांत पास झाले.

हेही वाचा :  टेक्नोसॅव्ही पुणेकर गोड गप्पांना भुलले, चार महिन्यात फसवणूकीचा उच्चांक पाहून हैराण व्हाल

रेल्वेचे तिकीट काढले… गाडीला उशीर झाल्याने रद्द केले

नोएडा येथील रहिवासी असलेल्या तरुणीने दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढले होते. पण रेल्वे उशिराने आली. त्यामुळे तिने तिकीट रद्द केले. तिकीट रद्द केल्यानंतर, रिफंड मिळविण्यासाठी तिने Google वरुन IRCTC च्या कस्टमर केअरचा नंबर काढला. मात्र हा क्रमांक बनावट होता. त्या नंबरवर कॉल केला तेव्हा त्याला दुसऱ्या बाजुकडून उत्तर मिळाले की त्याचा कॉल रिफंड टीमकडे हस्तांतरित केला जात आहे. तेथून त्यांना एका लिंकवर जाऊन तक्रार नोंदवावी लागेल असे सांगण्यात आले. लिंकवर क्लिक केल्यावर मोबाइलमध्ये एक अॅप इन्स्टॉल झाले, ज्यामुळे संपूर्ण मोबाइल हॅक झाला आणि इथेच मोठा घोटाळा झाला. मोबाईल हॅक झाल्यानंतर खात्यातून काही मिनिटात पैसे गायब झालेत. त्यामुळे इंटरनेटवर काही गोष्टी सर्च करताना काळजी घ्या. 

पैसे काढल्याचे मेसेज आला. त्यानंतर तिने नेट बँकिंगमध्ये माध्यमातून लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, येणारा ओटीपीही हॅकरला दिसत होते. बँक खात्यातून पूर्ण पाच लाख रुपये गायब झालेत. तसेच तीन लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले गेले. आपली फसवणू लक्षात येताच पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा :  बहुतांश AC युनिट पांढऱ्या रंगाचे का असतात? 99% लोकांना यामागचं कारणच माहित नाहीये

कस्टमर केअर’ नंबर सर्च करु नका!

गूगलवर सर्च करणे टाळले पाहिजे. कारण गूगलच्या सर्च इंजिनमध्ये वरच्या लिंकवर दिसणारे नंबर सायबर ठगांचेही असू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तो नंबर न तपासता थेट डायल केला तर समजून घ्या की तुम्ही सायबर फ्रॉडला बळी पडू शकता.  

फसवणूक टाळण्यासाठी काय करावे ?

जेव्हा तुम्ही गूगल सर्चवर कंपनी किंवा बँकेचा हेल्पलाईन किंवा कस्टमर केअर नंबर शोधता तेव्हा तो नीट तपासा. ज्या कंपनीच्या किंवा बँकेचा हेल्पलाइन नंबर तुम्हाला शोधायचा आहे, त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर थेट जाणे केव्हाही चांगले. जर तुम्हाला बँकेशी संबंधित माहिती विचारणारा कॉल आला तर असे तपशील शेअर करु नका.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …