Google मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार ‘हे’ Apps

Google News : टेक (Tech News) जगतात येणारी प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक नव्या मॉडेलचा फोन खरेदी करण्याची प्रत्येकाचीच कुवत नसते. अनेकजण वर्षानुवर्षे एकच स्मार्टफोन वापरत आपली कामं पूर्ण करतानाही दिसतात. पण, नवे अपडेट या (Smartphones) स्मार्टफोन्सना सपोर्ट करत नसल्यामुळं युजर्सपुढे मोठी समस्याच उभी राहते. अनेकदा फोनची कार्यक्षमता कमी होते अशा वेळी मग अनेकजण आधार घेतात तो म्हणजे Third Party speed booster Apps चा. 

मुळात हे अॅप्स सुरुवातीला प्रचंड फायद्याचे ठरतात. आपल्या फोनची कार्यक्षमताही तुलनेनं वाढलेली असते. पण, त्याची दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? याच अॅप्सचे अनेक चुकीचे परिणामही तुमच्या स्मार्टफोनवर होत असतात. 

गुगलची कारवाई….

दरम्यान, आगामी Android 14 मध्ये मात्र असे अॅप्स सपोर्ट करणार नाहीत. गुगलच या अॅप्सविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. थोडक्यात गुगलकडून या Speed Booster अॅप्सविरोधात पावलं उचलली जाऊ शकतात. KILL BACKGROUND PROCESSES च्या नावाखाली स्मार्टफोनमधील डेटा नष्ट करणाऱ्या या अॅप्सना Android 14 मध्ये स्थान मिळणार नाहीये. 

OS चं स्वत:चं टास्क मॅनेजमेंट असतं. ज्यामुळं ही सिस्टीमच मोबाईलमधील मेमरी मॅनेज करण्यासाठी मदत करते. परिणामी वेगळे स्पीड बूस्टर वापरण्याचा सल्ला केव्हाच दिला जात नाही. त्यामुळं आता सर्वाधिक वापरात असणारी ही स्पीड बूस्टर अॅप्स नसल्यामुळं तुम्ही नेमका तुमच्या फोनचा स्पीड कसा कायम ठेवाल? यासाठीही काही Tricks आहेत… 

हेही वाचा :  Tata Tiago EV Price Hike: Tata चा मोठा झटका! सर्वात स्वस्त Electric Car केली महाग, आता इतक्या किंमतीला मिळणार

वापरात नसणारे अॅप्स बंद करा 
एकाच वेळी अनेक अॅप्स सुरु ठेवल्यामुळं फोन Slow काम करु लागतो. त्यामुळं काम होताच ते अॅप बंद करण्याची सवय ठेवा. 

 

मोबाईल अपडेट ठेवा 
जेव्हाजेव्हा सिस्टीम अपडेट येईल तेव्हातेव्हा फोन अपडेट ठेवा. ज्यामुळं त्याची कार्यक्षमता टीकून राहील. 

Lite अॅप्स वापरा 
अनेक लोकप्रिय अॅप्सचे Lite वर्जनही आहेत. त्यामुळं तेच वर्जन वापरण्याचा सल्ला दिला जातो. 

cache नियमित क्लिअर करा 
cache डेटामुळं मोबाईल अनेकदा बंद होतो किंवा व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळं cache नियमित क्लिअर करा. 

वापरात नसणारे Apps डिलीट करा 
सहसा एकदा दोनदा वापर केल्यानंतर अनेक अॅप्स आपण पुन्हा कधीच वापरत नाही. असे सर्व अॅप्स फोनमधून काढून टाका. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?

First Video Call : आताच जग हे इंटरनेटचं जाळ आहे. इथे प्रत्येक व्यक्तीच्या मग तो …

WhatsApp ने दिले मोठे अपडेट; नवीन फिचर केले लाँच; Zuckerberg दिली माहिती

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप हे आजच्या पिढीसाठी खूप गरजेचे झाले आहे. ऑफिसच्या कामांसाठी ते पर्सनल चॅटिंगसाठीहे …