Jio ची खास Offer! एकाच रिचार्जमध्ये चालवा चार मोबाईल , सोबत Amazon-Netflix फ्री

Jio Recharge Plan : जिओने प्लान (Jio Recharge Plan) परवडणाऱ्या किमतीसाठी आणि त्यामध्ये उपलब्ध असलेल्या धमाकेदार ऑफरसाठी ओळखले जातात. या प्लानमध्ये ग्राहकांना कॉलिंग (calling) आणि इंटरनेट (internet) सोबतच इतर अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही पण प्रीपेड रिचार्ज वापरत असाल तर आज तुम्हाला एका स्वस्तात मस्त प्लानविषयी सांगणार आहोत. जो तुमच्या प्लान तुमच्या बजेटमध्ये सहज बसेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व काही यात मोफत मिळेल…

Jio ने नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत जे फॅमिली पॅकसह ( Jio launches postpaid family plans) उपलब्ध केला आहे. जर तुम्हाला चार लोकांसाठी एकच प्लॅन हवा असेल तर Jio चा नवीन रिचार्ज तुमच्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे. यामध्ये Jio Plus पोस्टपेड प्लॅन जारी केला असून ज्यांची किंमत फक्त 399 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही इतर तीन यूजर्स देखील जोडू शकता. म्हणजेच एका रिचार्जमध्ये चार लोकांचे रिचार्ज करू शकतात. त्यामध्ये मग तुमच्या कुटूंबाचे सदस्य असो किंवा मित्र-मैत्रीणी असो तुम्ही स्वता: सह चार जणांना रिचार्ज करू शकता. 

वाचा: सोन्याला पुन्हा झळाळी, आज तब्बल इतक्या रुपयांनी सोनं महागलं 

हेही वाचा :  Jio होळी धमाका! रोज २.५ जीबीपर्यंत डेटा देणारे प्लान लाँच, जाणून घ्या | Reliance Jio Launch 2 Plan for Work From Home

4 लोकांसह Jio चा पोस्टपेड प्लान आधीच अस्तित्वात असला तरी त्याची किंमत जास्त आहे. त्याच वेळी, या रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनुसार कनेक्शन निवडण्याचे स्वातंत्र्य देखील मिळते. म्हणजेच, वापरकर्ते दोन, तीन किंवा चार कनेक्शन जोडू शकतात. त्यानुसार त्यांना किंमत मोजावी लागेल. Jio ने 299 रुपये, 399 रुपये, 599 रुपये आणि 699 रुपये किंमतीचे चार नवीन प्लान लॉन्च केले आहेत. हे सर्व प्लॅन 22 मार्चपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. या प्लॅनमध्ये नेमका काय फायदा मिळू शकतो याबद्दल जाणून घेऊया… 

काय फायदा होईल?

Jio चा नवीन प्लॅन 299 रुपयांपासून सुरू होत आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग, 30GB डेटा, अमर्यादित SMS सारख्या सुविधा मिळतात. तर 599 रुपयांचा प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस, डेटा आणि SMSची सुविधा मिळते. तुम्ही या योजनेची मोफत चाचणी देखील घेऊ शकता. वापरकर्त्यांना एक महिना विनामूल्य चाचणी मिळेल.

फॅमिली प्लॅनमध्ये काय ऑफर आहे?

399 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंगसह 75GB डेटा, अमर्यादित एसएमएस आणि तीन कनेक्शन अॅड-ऑनची सुविधा मिळते. लक्षात ठेवा की प्रत्येक कनेक्शन अॅड-ऑनसाठी तुम्हाला अतिरिक्त 99 रुपये मोजावे लागतील. तुम्ही त्याची मोफत चाचणी देखील वापरू शकता.

हेही वाचा :  Data Plan : अवघ्या 61 रुपयांमध्ये मिळवा 5G डेटा; खिशाला परवडणारा प्लान एकदा वापराच

तर 699 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग, 100GB डेटा आणि अमर्यादित एसएमएस सुविधा मिळते. यामध्ये यूजर्सना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल. तुम्ही Jio च्या या प्लॅनमध्ये 3 अतिरिक्त कनेक्शन देखील जोडू शकता.

जर तुम्ही नवीन ग्राहक असल्यास तर सिम सक्रिय करण्यासाठी 99 रुपये आकारले जातील. याशिवाय तुम्हाला 500 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरावे लागतील. तथापि, कंपनी Jio Fiber वापरकर्ते, कॉर्पोरेट कर्मचारी, विद्यमान नॉन-जिओ पोस्टपेड वापरकर्ते आणि काही इतरांसाठी सुरक्षा ठेव माफ करत आहे.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?

First Video Call : आताच जग हे इंटरनेटचं जाळ आहे. इथे प्रत्येक व्यक्तीच्या मग तो …

WhatsApp ने दिले मोठे अपडेट; नवीन फिचर केले लाँच; Zuckerberg दिली माहिती

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप हे आजच्या पिढीसाठी खूप गरजेचे झाले आहे. ऑफिसच्या कामांसाठी ते पर्सनल चॅटिंगसाठीहे …