निज्जरच्या हत्येचे पुरावे भारताला दिले का? ट्रूडो म्हणाले, ‘आम्ही काही आठवड्यांपूर्वी…’

Canadian PM Trudeau On Evidence Given To India About Nijjar Killing: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांसंदर्भात पुरावे मागितले असता चालढकल करण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. ट्रूडो यांनी आता, “अनेक आठवड्यांपूर्वी” भारताला आम्ही पुरावे दिले आहेत, असा दावा केला आहे. या पुराव्यांमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटही सहभागी असल्याचा दावा करण्यात आल्याचा सांगण्यात आलं आहे. 

नेमके कोणते पुरावे भारताला दिले हे अस्पष्ट

ट्र्डो यांनी आता कॅनडाने या प्रकरणामध्ये काही आठड्यांपूर्वीच पुरावे सादर केले आहेत असा दावा केला आहे. नवीन दिल्लीकडे या प्रकरणाचं गांभीर्य आम्ही खळवलं आहे. ओटावाने (कॅनडाची राजधानी) या प्रकरणासंदर्भात प्राधान्यक्रमाने दिल्लीला सूचित केलं आहे असं ट्रूडो म्हणाले. मात्र नेमके कोणते पुरावे भारताला दिलेत हे त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी केवळ अनेकदा आम्ही पुरावे भारताला आधीच सुपूर्द केल्याचं म्हटलं.

प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न असल्याचा दावा

पत्रकारांनी भारतावर केलेल्या आरोपावरुन प्रश्न विचारला असता ट्रूडो यांनी, “कॅनडाने विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या पुरावे भारताला सोपवले आहेत. त्यावरुनच मी सोमवारी संसदेमध्ये विधान केलं. आम्ही अनेक आठवड्यांपूर्वीच हे पुरावे भारताला दिलेत. आम्हाला अपेक्षा आहे की ते आमच्याशी याबद्दल चर्चा करतील. ही चर्चा झाली तर या गंभीर प्रकरणाच्या मूळाशी जाता येईल,” असं उत्तर दिलं. ट्रूडो यांनी कॅनडा दौऱ्यावर असलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांच्याबरोबर एका पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भारतावर केलेल्या आरोपाबद्दल, “मी केवळ इतकं सांगू इच्छितो की आम्ही काही आठवड्यांपूर्वी त्या आरोपांबद्दल, विश्वासार्ह माहिती भारताला दिली आहे. आम्ही माहिती पुरवण्याचं काम केलं आहे,” असं म्हटलं.

हेही वाचा :  सीमा हैदरनंतर आणखी एक तरुणी सीमा ओलांडणार, भारतीय तरुणाशी थाटामाटात केलं लग्न, फोटोंची चर्चा

भारत म्हणतो कोणतीही माहिती दिली नाही

कॅनडाने या प्रकरणामध्ये काही पुरावे सादर केले आहेत का याबद्दल विचारलं असता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने, “कॅनडाने या प्रकरणासंदर्भात आता किंवा त्यापूर्वी आपल्याबरोबर कोणतीही माहिती शेअर केली नाही. आम्ही कोणत्याही विशेष सूचनेवर किंवा माहितीवर काम करण्यास तयार आहोत, हे यापूर्वीच जाहीर करण्यात आलं आहे,” असं म्हटलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी, “आम्ही कॅनडीयन पक्षाला हे कळवलं आहे की आम्हाला काही विशेष माहिती पुरवत असतील तर आम्ही त्यावर विचार करण्यास तयार आहोत,” असं म्हटलं. 

निज्जरची हत्या झाली जूनमध्ये

खलिस्तानी दहखतवादी हरदीप सिंग निज्जरची 18 जून रोजी ब्रिटीश कोलंबियामध्ये गोळी मारुन हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी ट्रूडो यांनी हत्याकांडामागे भारतीय एजंट्स असल्याचं म्हटलं. भारताने हे आरोप बिनबुडाचे आणि काही विशिष्ट हेतूने प्रेरित असल्याचं म्हणत फेटाळून लावले. भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केलं. कॅनडाने तडकाफडकी भारतीय अधिकाऱ्याला मायदेशी पाठवल्याने भारतानेही अशीच कारवाई केली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …