सीमा हैदरनंतर आणखी एक तरुणी सीमा ओलांडणार, भारतीय तरुणाशी थाटामाटात केलं लग्न, फोटोंची चर्चा

पाकिस्तानातून (Pakistan) भारतात आलेल्या सीमा हैदरची (Seema Haider) चर्चा अद्याप सुरु असतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. पण यामध्ये पाकिस्तानी तरुणीने सीमा ओलांडली नसून, तिथे त्यांच्या देशातूनच भारतीय तरुणाशी लग्नगाठ बांधली आहे. राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूर (Jodhpur) येथे राहणाऱ्या अरबाजने पाकिस्तानच्या अमीनाशी लग्न केलं आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे दोघे विवाहबंधनात अडकले. यावेळी भारत आणि पाकिस्तानात बसलेल्या काझींनी हे लग्न लावून दिलं. 

या लग्नाला दोघांचेही नातेवाईक उपस्थित होते. नातेवाईकांसाठी यावेळी लग्नमंडपात एलईडी लावण्यात आले होते. आता व्हिसा मिळाल्यानंतर नवरीमुलगी भारतात येणार आहे. अरबाजचे वडील मोहम्मद अफजल हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. अरबाज हा त्यांचा लहान मुलगा आहे. या लग्नासंबंधी बोलताना त्यांनी संगितलं की, “दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव असला, तरी नाती तयार होण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. निकाह झाला असून आता आम्ही लवकरच व्हिसासाठी अर्ज करणार आहोत. व्हिसा मिळाल्यानंतर नवरीमुलगी पाकिस्तानातून या घरी येईल. या लग्नामुळे आमचं संपूर्ण कुटुंब आनंदी आहे”.

सीमा हैदरचं नशीब चमकलं! बॉलिवूड चित्रपटात निभावणार रॉ एजंटची भूमिका? VIDEO व्हायरल

हेही वाचा :  थंडीत मौनी रॉयने वाढवले इंटरनेटचे तापमान, चैनने बनवलेला ड्रेस परिधान करुन चाहत्यांच्या हृदयावर केले थेट वार

 

अफजल यांनी सांगितलं आहे की, आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबांसाठी ऑनलाइन निकाह होणं फार चांगली बाब आहे. यामुळे खर्च कमी होतो आणि लग्नही व्यवस्थित पार पडतं. अफजल म्हणाले की, माझ्या लहान मुलाच्या सासरचे लोक फार सामान्य कुटुंबातील आहेत. या लग्नात त्यांचा जास्त पैसा खर्च झाला नाही. आता जेव्हा नवरीमुलगी येईल तेव्हा आम्ही अत्यंत थाटामाटात तिचं स्वागत करु. 

मोहम्मद अफजल यांचा लहान मुलगा वकिलीसह व्हिडीओ एडिटिंगचं काम करतो. मोहम्मद अरबाजने हे लग्न कुटुंबाने ठरवलं असल्याची माहिती दिली आहे. नातेवाईकांनी हे स्थळ शोधलं आणि त्यानंतर हे लग्न ठरलं असं त्याने सांगितलं आहे. सध्या व्हिसा मिळत नसल्याने, आम्ही ऑनलाइन लग्नाचा पर्याय निवडला. 

‘भारतातील निकाहनामासह व्हिसासाठी अर्ज करणार’

अरबाजने सांगितलं आहे की, पाकिस्तानात जाऊन आम्ही लग्न केलं असतं तर त्याला भारतात मान्यता मिळाली नसती. येथे येऊन आम्हाला पुन्हा लग्न करावं लागलं असतं. आता आम्ही भारतातील निकाहनाम्यासह व्हिसासाठी अर्ज केला तर तो सहजपणे मिळेल. 

सीमा हैदर बॉलिवूड चित्रपटात झळकणार?

प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरची एका प्रोडक्शन हाऊसने नुकतीच भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी तिचं ऑडिशनही घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे जानी फारयफॉक्सच्या टीमने बुधवारी सीमाची भेट घेतली. यावेळी त्यांनी आगामी चित्रपट ‘अ टेलर मर्डर स्टोरी’ चित्रपटासाठी तिचं ऑडिशन घेतलं. या चित्रपटात सीमा रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट राजस्थानच्या उदयपूर येथील कन्हैयालाल या टेलरच्या हत्येवर आधारित असणार आहे. कन्हैय्यालाल यांची त्यांच्याच दुकानात अतिरेक्यांनी निर्घृणपणे हत्या केली होती. दरम्यान, चित्रपटात काम करण्याआधी सीमा हैदर आणि प्रोडक्शन हाऊस एटीएसच्या अहवालाी वाट पाहत आहेत. 

हेही वाचा :  Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, शिर्डीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …