The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ला मिळणार होता गानकोकीळा लतादीदींचा आवाज

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतेच या सिनेमासंदर्भात विवेक अग्निहोत्रीने मोठा खुलासा केला आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले, गानकोकीळा लता मंगेशकर ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमात एक विशेष गाणं गाणार होत्या. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ते शक्य झाले नाही. 

‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमात धांकडधिंगा असणाऱ्या गाण्यांना वाव नव्हता. पण सिनेमात लोकगीत असावीत आणि ती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गावी, अशी विवेक अग्निहोत्री यांची इच्छा होती. पण आता त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली आहे. 

विवेक अग्निहोत्रींनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सिनेमासाठी गाणं गाण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देत लता मंगेशकरांनी ही विनंतीही मान्य केली होती. लता दीदी म्हणाल्या होत्या,”कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या गाण्याचे रेकॉर्डिंग करू”.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)



लता दीदींचे पल्लवी जोशीसोबत चांगले संबंध होते. त्यामुळेच त्यांनी या सिनेमासाठी गाणं गाण्याची तयारी दर्शवली होती. पण लता दीदींनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर जगभरातील संगीतप्रेमींनी शोक व्यक्त केला होता.

हेही वाचा :  'नय्यो लगदा' नंतर 'बिल्ली बिल्ली', सलमाननं शेअर गाण्याचा व्हिडीओ

संबंधित बातम्या

The Kashmir Files : ‘बिग बजेट’ चित्रपटांवरही भारी पडला ‘द कश्मीर फाइल्स’, तरीही विवेक अग्निहोत्रींना ‘या’ गोष्टीची खंत!

The Kashmir Files Box Office Collection Day 12: बिग बजेट चित्रपटांना धोबीपछाड, ‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच गाठणार 200 कोटींचा पल्ला!

Vivek Agnihotri,Pallavi Joshi : तीन वर्ष डेट केल्यानंतर घेतला लग्न करण्याचा निर्णय; पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची लव्ह स्टोरी माहितीये?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …