तुम्हालाही वाटतंय का भात खाल्ल्याने वजन वाढतंय? तर मग भात शिजवण्याची योग्य पद्धत

Weight Loss करताना अनेक जण सर्वात पहिल्यांदा भात सोडून देण्याचा सल्ला देतात. मात्र आपल्याकडे भारतात सर्वात जास्त भात खाल्ला जातो. भाताबाबत अनेक गैरसमज आहेत आणि त्याबाबत तुम्हाला माहीत असायला हवे. भात खाण्याची आणि त्याहीपेक्षा भात शिजविण्याची एक पद्धत आहे. वाढते वजन आता समस्या होत चालली आहे. मात्र त्यासाठी आधी भात कसा शिजवायचा त्याच्या काही ट्रिक्स जाणून घ्या आणि वजन करा कमी. (फोटो सौजन्य – Freepik.com)

भाताच्या बाबतीत काय सांगते संशोधन

भाताच्या बाबतीत काय सांगते संशोधन

भात खाल्ल्याने वजन वाढते हे काही अंशी खरं आहे मात्र तुम्ही भात खाऊच शकत नाही असं नाही. PubMed द्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार आशियात किमान १,१०,००० पद्धतीचे तांदूळ मिळतात. ज्यामध्ये वेगवेगळी पोषक तत्व आणि गुणवत्ता असते. पण अधिक प्रमाणात कॅलरी असतात. असे असले तरीही भातामध्ये अनेक पोषक तत्व अशी असतात जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

हेही वाचा :  झपाट्याने वितळेल पोट व कंबरेची चरबी, कॅन्सरचा धोका कायमचा संपेल, ताबडतोब सुरू करा हे 1 काम

कॅलरीच नाही तर पोषक तत्वांचा खजिना

कॅलरीच नाही तर पोषक तत्वांचा खजिना

न्यूट्रीफाय बाय पूनम अँड वेलनेस क्लिनिक अँड अकॅडमीच्या संचालक पूनम दुनेजानुसार भातामध्ये अनेक महत्त्वपूर्ण पोषक तत्व असतात, जे शरीराला उर्जा प्रदान करून आजारांच्या विरोधात लढण्यास मदत करतात. तांदळात सेलिनियम, मॅग्नेशियम, विटामिन बी, मँगनीज, लोह, थायमिन, फायबर याचे अधिक प्रमाण मिळते. तुपासह भात खाणे नेहमीच फायदेशीर ठरते अगदी आजारातही हे अन्न देण्यात येते. वजन न वाढण्यासाठी आणि साखरेची रक्तातील पातळी संतुलित राहण्यासाठी कसा भात शिजवावा जाणून घ्या.

अर्धा तास आधी भिजवा तांदूळ

अर्धा तास आधी भिजवा तांदूळ

भात शिजवण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे अर्धा तास आधी तांदूळ भिजवा. यामुळे पोषक तत्वात वाढ होते आणि शिजवण्याचा वेळही वाचतो. त्यामुळे भात शिजविण्याआधी अर्धा तास आधी तांदूळ भिजवून ठेवा.

(वाचा – पारंपरिक जेवणाचा स्वाद आणि सुगंध हवा असेल तर कसूरी मेथीचा करा वापर, सोप्या पद्धतीने घरीच बनवा)

कुकरपेक्षा बाहेर शिजवा

कुकरपेक्षा बाहेर शिजवा

कुकरमध्ये भात शिजविण्यापेक्षा बाहेर पातेल्यात भात शिजवा. त्यासाठी एक मोठे पातेले घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि उकळवा. पाणी उकळल्यानतंर त्यात दोन चमचे नारळाचे तेल मिक्स करा.

हेही वाचा :  तरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?

(वाचा – Cooking Hacks: कुकरमध्ये असा शिजवा भात होणार नाही कोरडा, सुटसुटीत आणि मोकळ्या भाताची योग्य पद्धत)

पाणी काढून तांदूळ मिक्स करा

पाणी काढून तांदूळ मिक्स करा

भिजवलेल्या तांदळातील पाणी काढून पातेल्यात उकळत असलेल्या पाण्यात तांदूळ मिक्स करा. त्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि भात मंद आचेवर शिजू द्या. हवं तर झाकण अर्धवट ठेवा. यामुळे पाणी आणि भात शिजल्याचा तुम्हाला व्यवस्थित अंदाज येऊ शकतो. मध्येच तांदूळ शिजला की नाही हे तुम्ही हाताने तपासून पाहू शकता.

(वाचा – घरात दही लावल्यावर पाणी सुटतंय का? घट्ट आणि गोड दही बनविण्याच्या सोप्या ट्रिक्स)

अतिरिक्त पाणी काढा

अतिरिक्त पाणी काढा

भात शिजल्याचे कळताच आतील अतिरिक्त पाणी चाळतीत गाळून घ्या. हे अतिरिक्त पाणीच तुमचे वजन वाढविण्यास कारणीभूत ठरते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर भातात अतिरिक्त पाणी अजिबात राहू देऊ नका. याला पेज असे म्हटलं जातं. तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर ही पेज फायदेशीर ठरते. हे तांदळाचे पाणी तुम्ही त्वचेसाठी वापरू शकता अथवा कपड्यांसाठी स्टार्च म्हणून वापरा.

वाफ ठेऊ नका

वाफ ठेऊ नका

सर्व पाणी काढल्यानंतर वूडन स्टिक अथवा चमच्याने तांदूळ व्यवस्थित ढवळून घ्या. यामुळे त्यात वाफ राहणार नाही. असा सुटसुटीत, मोकळा भात खाण्यासाठी तयार आहे आणि यामुळे तुमचे वनज वाढत नाही. भाजी, दही, सलाड, आमटी, कढीसह या भाताचा आस्वाद तुम्ही घेऊ शकतो.

हेही वाचा :  Cooking Hacks: कुकरमध्ये असा शिजवा भात होणार नाही कोरडा, सुटसुटीत आणि मोकळ्या भाताची योग्य पद्धत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …