झपाट्याने वितळेल पोट व कंबरेची चरबी, कॅन्सरचा धोका कायमचा संपेल, ताबडतोब सुरू करा हे 1 काम

चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी सकस व हेल्दी आहार घेणे खूप जास्त आवश्यक आहे. जर तुम्ही रोज तेच तेच सामान्य पदार्थ खात असाल तर तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळ करत आहात हे लक्षात घ्या, मग भले तुम्ही कितीही निरोगी गोष्टी खात असाल तरी अशी आहार पद्धती चुकीची आहे. आपल्या ताटात नेहमी वेगवेगळे निरोगी आणि रंगीबेरंगी पदार्थ असायला हवेत असे तज्ज्ञांचे मत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणजे काय? तर जेवणात रोज विविध रंगाची व प्रकारची फळे, भाज्या आणि धान्ये यांचा समावेश असायला हवा.

अशा पद्धतीच्या आहाराला एक्सपर्ट्स रेनबो डाएट (Rainbow Diet) असेही म्हणतात. नावासारखीच इंद्रधनुष्याप्रमाणे विविध रंगांच्या खाद्यपदार्थांचा या आहारात समावेश दिसून येतो. रेनबो डाएटच्या पदार्थांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए (बीटा-कॅरोटीन), व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, झिंक, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात. होलिस्टिक हेल्थ कोच आणि ‘ईट युअर केक, लूज युअर वेट’ चे लेखक अझहर अली सय्यद यांच्या मते, रेनबो डाएट तुम्हाला वजन नियंत्रित करण्यास आणि Diabetes, Cancer, आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतं. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलाचे पुण्यातील हॉटेल सील; PMC ची मोठी कारवाई

आहारात रंगांचे महत्त्व

आहारात रंगांचे महत्त्व

प्रत्येक खाद्यपदार्थाचा रंग त्यामध्ये असलेल्या काही विशेष रसायनांमुळे असतो, जो आरोग्यासाठी आवश्यक असतो. उदाहरणार्थ, पिवळ्या/केशरी रंगाच्या गोष्टींमध्ये कॅरोटीन असते, हिरव्या रंगाच्या गोष्टींमध्ये क्लोरोफिल असते, लाल आणि जांभळ्या रंगाच्या गोष्टींमध्ये अँथोसायनिन असते. ही सर्व रसायने चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
(वाचा :- Diabetes Yoga : या उपायात ठासून भरलंय डायबिटीजचा मुळापासून नाश करणारं इन्सुलिन, कधीच वाढणार नाही रक्तातील साखर)​

वजन कमी करण्यास होते मदत

वजन कमी करण्यास होते मदत

बहुतेक फळे आणि भाज्यांमध्ये कॅलरी, फॅट आणि साखर कमी व फायबर जास्त असते. याशिवाय पॉलिफेनॉलचे प्रमाणही जास्त असते. हेच कारण आहे की रोज थोड्या प्रमाणात त्यांचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. म्हणूनच जाणकार हा रेनबॉ डायट फॉलो करण्याचा सल्ला देतात. आजवर अनेकांना असा रेनबो डायट फॉलो करण्याचा मोठा फायदा झाला आहे.
(वाचा :- Snoring Home Remedy: आयुर्वेदातील हे 3 उपाय साफ करतात नाकातील घाण व बॅक्टेरिया, घोरण्याची समस्याही होते छुमंतर)​

हेही वाचा :  ट्विंकल खन्नाने तब्बल 2 वेळा तोडलं अक्षयसोबतचं लग्न, कारण..

फायबरची मात्रा असते जास्त

फायबरची मात्रा असते जास्त

बर्‍याच फळे आणि भाज्यांमध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे जास्त काळ तुमचे पोट भरलेले ठेवतात. यामुळे तुम्हाला जास्त भूक लागत नाही. शिवाय तुम्हाला जेवणादरम्यान अन्हेल्डी पदार्थ खाणे टाळण्यास मदत करू शकतात. खरे तर त्यातील नैसर्गिक गोडवा, पाणी आणि फायबरमुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला दिवसभर भूक लागत नाही व काही चटरपटर खाण्याची इच्छाही होत नाही.
(वाचा :- High Protein Vegetarian Food: चिकन व मच्छी न आवडणा-यांसाठी मोठी खुशखबर, प्रोटीनचा खजिना आहे हे 10 व्हेज पदार्थ)​

कॅलरी असते कमी

कॅलरी असते कमी

रेनबो डायट मध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टींमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. केळी, एवोकॅडो, स्वीट कॉर्न, हिरवे वाटाणे, द्राक्षे, खजूर, अंजीर, नारळ यांसारख्या गोष्टींमध्ये कॅलरीजचे प्रमाण थोडे जास्त असले तरी त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे तुमचे पोट भरेल आणि खाण्यावर नियंत्रण राहिल.
(वाचा :- Diabetes Milk: डायबिटीज किंवा Blood Sugar रूग्णांनी दूध पिणं सुरक्षित आहे? शास्त्रज्ञांनी दिलं सायंटिफिक उत्तर)​

भाज्या वाफेवरच शिजवाव्यात

भाज्या वाफेवरच शिजवाव्यात

जर तुम्हाला हेल्दी अन्न खायचे असेल तर एक सवय लावून घ्या ती म्हणजे आपले अन्न वाफेवरच शिजवावा आणि त्यात हर्ब्स आणि मसालेच वापरा. ब्रेडिंग आणि फ्रायिंग किंवा जास्त फॅट ड्रेसिंग किंवा सॉस वापरणे यासारख्या स्वयंपाकाच्या पद्धती तुमच्या आहारातील कॅलरी आणि चरबीचे प्रमाण वाढवतात. याचा थेट परिणाम तुमच्या आहाराच्या गुणवत्तेवर होतो आणि तुमचे वजन देखील वाढू लागते. मग भले तुम्ही कितीही हेल्दी खात साल तरी त्याचा जास्त उपयोग होत नाही.
(वाचा :- लिव्हरच्या भयंकर आजाराने गेला प्रसिद्ध इंडियन कॉमेडियन व Tv Host चा जीव, आजच खायचं बंद करा हे 7 पदार्थ नाहीतर)​

हेही वाचा :  मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, राज्यातल्या साडे सहाशे गावांमध्ये 'नो एन्ट्री'चे बॅनर्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …