‘द कश्मीर फाइल्स’ मोफत दाखवणाऱ्यांवर भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, खरा राष्ट्रवाद… | Vivek Agnihotri erupted after the announcement of The Kashmir Files for free abn 97


२५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १४३ कोटींच्या आसपास कमाई केली आहे

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे. सिनेमागृहांमध्ये लोकांची गर्दी होत आहे. या सगळ्यामध्ये हरियाणातील रेवाडी येथील काही नेत्यांनी लोकांना हा चित्रपट मोफत दाखवण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी एक पोस्टरही शेअर केले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी हे पोस्टर्स पाहिल्यानंतर आक्षेप घेतला आहे. अग्निहोत्री यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ दररोज चांगली कमाई करत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी दररोज चित्रपटगृहात पोहोचत आहे. त्याचवेळी, या सगळ्यात काही राजकारणी स्वखर्चाने किंवा फुकटात ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आपल्या लोकांना दाखवत आहेत. अशा स्थितीत हा चित्रपट प्रेक्षकांना फुकटात दाखवल्याबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी संताप व्यक्त केला आहे.

“काश्मीरची खरी फाईल काय आहे हे…”; The Kashmir Files चित्रपटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

हरियाणातील रेवाडी येथील भाजपा अध्यक्ष केशव चौधरी यांनी आपल्या जिल्ह्यात ‘द कश्मीर फाइल्स’ मोफत दाखवण्याची घोषणा केली आहे. यासाठी केशव चौधरी यांनी एक बॅनरही तयार केला आहे, ज्यामध्ये रविवार, २० मार्च रोजी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट २० X १० एलईडी स्क्रीनवर मोफत दाखवण्याची घोषणा करण्यात आली आहे. केशव चौधरीचे हे बॅनर छायाचित्र विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे.

हेही वाचा :  Ukraine War: नऊ बांग्लादेशींची मुक्तता केल्यामुळे शेख हसीनांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

या बॅनरचा फोटो शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे तक्रार केली आहे. आणि असे चित्रपट फुकटात दाखवू नयेत अशी विनंती केली. आपल्या ट्विटमध्ये मनोहर लाल खट्टरला टॅग करत विवेक अग्निहोत्री यांनी, “द कश्मीर फाइल्स अशा प्रकारे उघडे आणि फ्री दाखवणे गुन्हा आहे. मनोहर लाल खट्टर जी, मी तुम्हाला हे थांबवण्याची विनंती करतो. राजकीय नेत्यांनी सर्जनशील व्यवसायाचा आदर केला पाहिजे आणि खरा राष्ट्रवाद आणि समाजसेवा म्हणजे कायदेशीर आणि शांततेने तिकीट खरेदी करणे,” असे म्हटले आहे.

विवेक अग्निहोत्रीचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटवर दिग्दर्शकाचे चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. या चित्रपटाने रिलीजच्या आठ दिवसांत ११८ कोटींहून अधिक कमाई केली आहे. नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारी स्वतःच्या कमाईचा विक्रम मोडत या विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटाने २३ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

हेही वाचा :  चार मुलं असूनही एकटीच राहायची 90 वर्षांची महिला, वृद्धेसोबत घडलं भयंकर, मुलांना पत्ताच नाही

“आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पद्मश्री किंवा पद्मभूषण…”; ‘द कश्मीर फाइल्स’वरुन राऊतांचा भाजपावर निशाणा

रविवारी हा चित्रपट १५० कोटींचा टप्पा पार करेल यात शंका नाही. अक्षय कुमारचा बच्चन पांडेही त्याच्या मार्गात अडथळा ठरू शकला नाही. शनिवारी दुसऱ्या वीकेंडमध्ये, द काश्मीर फाइल्सने जबरदस्त उडी घेतली. एका दिवसात आतापर्यंतचे सर्वात मोठे कलेक्शन करत या चित्रपटाने २३ कोटी ते २५ कोटींचा व्यवसाय केला आहे. अशा प्रकारे त्याची एकूण कमाई १४३ कोटींच्या आसपास पोहोचली आहे. २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट, ज्यामध्ये एकही सुपरस्टार नाही, एवढा मोठा व्यवसाय करेल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …