पंजाब सरकारचा मोठा निर्णय, प्रत्येक बिलावर 600 युनिटपर्यंत वीज मोफत

चंदीगढ : CM Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आता प्रत्येक बिलावर 600 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा भगवंत मान केली आहे.  याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

 प्रत्येक बिलावर 600 यूनिट वीज मोफत मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करत दिली आहे. आम्ही जनतेला आश्वासन दिले होते की, आमचे सरकार (AAP) सत्तेत आल्यानंतर आम्ही 300 यूनिट वीज मोफत देऊ. सरकारने या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले आहे. आता प्रत्येक बिलावर 600 युनिटपर्यंत वीज मोफत मिळेल. आम्ही जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत. त्याची सुरुवास झाली आहे, असे मुख्यमंत्री मान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधी दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीकरांना घरगुती वीज 200 युनिटपर्यंत मोफत दिली होती. आता पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने 600 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याआधी मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने थेट घरपोच धान्य देण्याचा निर्णय घेतला होता.  यामुळे पंजाबमधील 1.54 कोटी लाभार्थी जनतेला गव्हाचा आटा घरपोच मिळत आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाने विविध विभागांत  26,454 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याशिवाय शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई, एक आमदार एक पेन्शन योजनेलाही मंजुरी दिली होती.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जगातील अशी जागा जिथे सीट बेल्ट घातल्यास लावला जातो दंड! जाणून घ्या यामागचं कारण

मुंबई : ट्राफीकच्या महत्वाच्या नियमांपैकी एक आहे ते म्हणजे सीट बेल्ट लावणे. तुम्ही जर कार …

मुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, मात्र ‘वाघा’ने उचलून नेल्याचा आरोप!

बहराइच, उत्तर प्रदेश : Girlfriend Ran Away With Boyfriend : अनेकदा प्रेमीयुगलांना असे वाटते की …