झी मराठीवर दार उघड बये ही नवी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. रुढी परंपरांच्या सीमा पार करून संबळ वाजवणाऱ्या मुलीच्या आयुष्याची गोष्ट मालिकेतून दाखवण्यात येणार आहे. यानिमित्तानं कलाकारांच्या आयुष्यातील दार उघड मुमेंट शेअर करण्यात आल्यात. त्यावेळी बोलताना धनश्रीनं तिच्या पहिल्या कार्यक्रमाच्या आठवणी शेअर करत तिची पहिली दार उघड मुमेंट शेअर केली आहे.
हेही वाचा – Shreya Bugade : प्रेक्षकांना हसवणाऱ्या श्रेया बुगडेला खऱ्या आयुष्यात वाटते ‘या’ गोष्टीची भीती; पाहा व्हिडीओ
’12 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा सुपरस्टार शो सुरू झाला होता. जो शो एक अँक्टिंग हंट शो होता. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेत मुलं मुली आली होती. त्यातून माझ सिलेक्शन झालं. मी टॉप 5 मध्ये आले. ती स्पर्धा झाल्यानंतर मला स्वत:हून अनेक कामांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मी कामं करत गेले. तेव्हा मला जाणवलं की हे क्षेत्र आपल्याला आवडतंय. या क्षेत्रातच आपल्याला काही तरी करायचं आहे. हा क्षण माझ्या आयुष्यातील दार उघड प्रसंग होता’, असं धनश्री म्हणाली.
धनश्रीनं 2012मध्ये महाराष्ट्राच्या सुपरस्टार कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर 2013मध्ये ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ही धनश्रीची पहिली मालिका होती. त्यात ती प्रमुख नायिका होती तर तिच्याबरोबर अभिनेता ललित प्रभाकरही प्रमुख भूमिकेत होता. त्यानंतर तिनं ‘चिठ्ठी’ या सिनेमात काम केलं. 2016मध्ये धनश्रीला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली आणि धनश्री खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आली. गंध फुलांचा गेला सांगून मालिकेच्या आधी धनश्री ‘माझीया प्रिया प्रीत कळेना’ या मालिकेतही दिसली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या