Tag Archives: marathi batmya

दुपारी आई झोपली; 10 महिन्याच्या बाळाने रांगत जाऊन बादलीत घातलं तोंड, पुढे जे झालं..

Nagpur Death: मुलं लहान असताना त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे पालकांचे बारीक लक्ष असणे आवश्यक असते. त्यांच्याकडे थोडेही दुर्लक्ष झाल्यास मुलं काय करतील हे सांगता येत नाही. अशाच एका घटनेत 10 महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. काय आहे ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. दहा महिन्याचा चिमुकला रांगत रांगत पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना …

Read More »

Success Story: आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा, संघर्ष करुन संगमनेरचा केवल बनला महाराष्ट्र पोलीस

Success Story: आई वडिलांसोबत पोलपाट लाटणं विकलं, कॉलेज शिकता शिकता लग्न समारंभात वाडपी म्हणून काम केलं. घरची परिस्थिती तशी बेताची. पण त्याने हार मानली नाही. आता तो महाराष्ट्र पोलीस म्हणून रुजू होतोय. संगमनेर जिल्हा अहमदनगरमध्ये राहणाऱ्या केवल दारासिंग कतारी याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. केवल हा संगमनगरच्या संजय गांधी झोपडपट्टीत राहतो. त्याचे आई वडिल पोलपाट लाटणे बनवण्याचे काम करतात. जत्रेत …

Read More »

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची उघड नाराजी, ‘स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठावंतांसोबत…’

Medha Kulkarni: पुण्यात आज चांदणी चौक उड्डाणपुलाचं लोकार्पण केलं जाणारेय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थिती हा लोकार्पण सोहळा पार पडणारेय.  दरम्यान चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगलंय. लोकार्पण सोहळण्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून आणि पोस्टर्सवर  कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा उल्लेख न केल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय.  मेधा कुलकर्णी यांनी कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर …

Read More »

‘आई, मला इथून घरी घेऊन जा’ संभाषण ठरलं शेवटचं! दुसऱ्या दिवशीच वसतीगृहात विद्यार्थ्याचा मृतदेह

Jadavpur University Ragging News: पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठाच्या वसतीगृहात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या स्वप्नादिप कुंडूचा मृत्यू झालाय. वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थी पडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पडून गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान स्वप्नादिन याचा मृत्यू झाला. इमारतीपासून काही फूट अंतरावर स्वप्नदीप कुंडू नग्नावस्थेत आढळून आला.  दरम्यान त्याच्यावर रॅगिंग झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. स्वप्नदीपने बंगाली पदवी अभ्यासक्रमासाठी या विद्यापीठात प्रवेश घेतला …

Read More »

शिकवण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली:  हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे अवघ्या 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  एका सात वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना समोर आलीये. याप्रकरणी या अल्पवयीन आरोपी विरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात …

Read More »

स्वातंत्र्यदिनाचे जिओच्या ग्राहकांना गिफ्ट, अमर्यादित कॉलिंगसह 5800 रुपयांच्या ऑफर्स

Independence Day Offer: देशातील नंबर एकची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी दररोज नवीन रिचार्ज प्लान्स आणत असते. इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आता स्वातंत्र्य दिनानिमित्तदेखील जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लान आणला आहे. अनेकांना दर महिन्याला रिचार्ज करायला आवडत नाही, अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओने एक शानदार प्लान आणला आहे. ज्याची किंमत …

Read More »

लष्कराला 2 दिवसांत मणिपूर हिंसा थांबवणं शक्य होतं, पण ‘त्यांना’ आग पेटती ठेवायचीय -राहुल गांधी

Rahul Gandhi Reaction on Mnaipur:  मणिपूर हिंसेबद्दल बोलताना पंतप्रधान हसत होते असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.  मी मणिपूरमध्ये जे पाहिले ते लोकसभेत मांडले. मणिपूरमध्ये भारताला संपवण्यात आल्याचे मी म्हणालो. पण याचा विपर्यास केला गेल्याचे ते म्हणाले. मी उथळपणे बोललो नाही, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. …

Read More »

Pune Crime: आधी लैंगिक अत्याचार वर पुरुषी अहंकार! तरुणीने तक्रार केली म्हणून ‘तसले’ व्हिडिओ व्हायरल

Pune Crime: कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचाराच्या घटनेत पीडित पोलीस स्थानकाची पायरी चढतात. येथे आपल्याला न्याय मिळेल याची त्यांना खात्री असते. पण पोलीस स्थानकात न्याय मागायला गेली म्हणून तरुणीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. अर्जुन मुंडे असे या तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणी आणि आरोपी अर्जुन हे पुण्यातील रहिवाशी आहेत. त्या दोघांचाही एकमेकांसोबत चांगला परिचय …

Read More »

मित्रांसोबतच्या भांडणामुळे चिडचिड, अकरावीच्या विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरुन मारली उडी

UP Student Sucide: सोळावं वरीस धोक्याचं असं म्हणतात. कारण सोळा वर्षे पूर्ण होऊन सतराव लागत असताना मुलं हळुहळू वयात येत असतात. त्यावेळी त्यांच्यात शारीरिक, मानसिक असे अनेक बदल होत असतात. अशावेळी ते कोणत्या गोष्टी मनाला लावून घेतील, हे सांगता येत नाही. याकडे पालकांचे थोडे जरी दुर्लक्ष झाल्यास अनर्थ घडायला वेळ लागत नाही. अशीच एक दुर्घटना नुकतीच समोर आली आहे. ज्यामध्ये …

Read More »

‘मनरेगा’ अंतर्गत शेकडो पदांची भरती, आठवी, दहावी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

MGNREGA Job 2023: आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महात्मा गांधी …

Read More »

Nashik Job: नाशिक जिल्हा परिषदेत बंपर भरती, 1 लाखांपर्यंत मिळेल पगार

Nashik Job: नाशिकमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  नाशिक जिल्हा परिषद भरती अंतर्गत ग्रामसेवक (कंत्राटी) – 50, आरोग्य पर्यवेक्षक – 3, आरोग्य परिचारिका – 597, आरोग्य सेवक …

Read More »

मोबाईल चार्जरने केला घात, मध्यरात्री आई-मुलाचा घेतला जीव; मन हादरवणारी घटना

Mother and Son Died: मोबाईल चार्जर ही प्रत्येकाच्या घरात आढळणारी, सर्वसाधारण दिसणारी वस्तू असते. पण हाच चार्जर कोणाच्या मृत्युचे कारण ठरु शकतो का? हो मोबाईल चार्जने आई आणि मुलाचा मृत्यू ओढावला आहे. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये ही घटना घडली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  सीतापूरच्या रामपूर मथुरातील भगवतीपूर गावात रोहित जयस्वाल आणि त्याची आई रामशेली …

Read More »

नाही म्हणजे नाहीच! पुणेकरांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय मागे

Pune Water Shutdown: पुणेकरांवर एखादा निर्णय लादणे हे खूपच कठीण मानले जाते. एखादा निर्णय डोइजड होतोय असे वाटले तर पुणेकर तात्काळ त्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडतात. आणि त्या निर्णयापासून त्यांची सुटका होते. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे ‘पुणे तिथे काय उणे!’ असेच म्हणावे लागेल.  पुणे महापालिकेने 10 …

Read More »

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागांमध्ये 12 तास पाणीकपात

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील काही विभागात पाणीकपात करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेने याबाबत घोषणा केली आहे. 8 ऑगस्ट रोजी जवळपास 12 तास नवी मुंबईतील काही परिसरात पाण्याचा पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.  नवी मुंबई …

Read More »

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; ‘या’ तारखेला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद

Pune Water Cut: भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात 10 ऑगस्ट रोजी पाणी कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. महावितरण (Maharashtra State Electricity Distribution) पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने …

Read More »

या ‘नाच्या’मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका

रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली :  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) दिल्लीतील जंतर मंतर इथं अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे एक दिवसीय सांकेतिक उपोषण करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील महिलांनी या उपोषणात सहभाग घेतला.  उपोषणस्थळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणार असल्याचं आश्वासन खासदार …

Read More »

VIDEO : धावत्या बाइकवर बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून तरुणीचा रोमान्स, व्हिडीओ Viral झाल्यानंतर

Couple Romance on Biike Video Viral : सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओचा खजिना आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्षणाक्षणावर व्हिडीओ पोस्ट होतं असतात. काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके चुकतात. सध्या सोशल मीडियावर कपलचा रोमान्सचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (couple video) आजकाल पाहवं तिकडे कपल बिनधास्त अश्लिल चाळे (Couple Romance video) करताना दिसतात. पर्यटन …

Read More »

राज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, “एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण…”

Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासहीत काही राष्ट्रवादी आमदारांनी मागील रविवारी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘चिखल करुन ठेवलाय’ असं म्हटलं होतं. दरम्यान अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अन्य 9 सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईमधील …

Read More »

…तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा

Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपणच काँग्रेसचे मुख्यमंत्री झालो असतो असं विधान केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांच्या (Sharad Pawar) भूमिकेसंदर्भात भुजबळ बोलत होते. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर शरद पवारांनी तुम्हाला पुन्हा संधी दिली असं असताना तुमच्यावर अत्याचार झालं असं तुम्ही कसं म्हणून …

Read More »

Ajit Pawar Speach: 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती, आजपर्यंत राष्ट्रवादीचाच CM असता! पण…

Maharashtra Politics Ajit Pawar Speach: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा थेट उल्लेख न करता टीका केली आहे. एमईटी येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान केलेल्या जाहीर भाषणामध्ये अजित पवारांनी 2004 साली पक्षाकडे मुख्यमंत्रीपद चालून आलेलं असताना वरिष्ठ नेत्यांनी ती संधी न घेता चार मंत्रीपद अतिरिक्त घेतली. मात्र तेव्हा संधी घेतली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच …

Read More »